इनाफमुळे शेतकऱ्याला मिळाली हरविलेली म्हैस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:23 IST2021-02-20T05:23:00+5:302021-02-20T05:23:00+5:30

वणी तालुक्यातील ब्राह्मणी येथील शेतकरी अशोक श्यामराव आवारी यांची काही दिवसांपूर्वी म्हैस हरविली होती. त्यामुळे त्यांनी सर्वत्र शोधाशोध केली. ...

Inaf gives the farmer a lost buffalo | इनाफमुळे शेतकऱ्याला मिळाली हरविलेली म्हैस

इनाफमुळे शेतकऱ्याला मिळाली हरविलेली म्हैस

वणी तालुक्यातील ब्राह्मणी येथील शेतकरी अशोक श्यामराव आवारी यांची काही दिवसांपूर्वी म्हैस हरविली होती. त्यामुळे त्यांनी सर्वत्र शोधाशोध केली. मात्र, ती आढळली नाही. दरम्यान, वरोरा तालुक्यातील एका गावात सदर म्हैस आढळून आली. मात्र, नेमकी ती कुणाची, याबाबत ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. सरपंच महाकुलकर यांनी तत्काळ चंद्रपूर येथील पशुसंवर्धन विभागाला माहिती दिली. पशुसंवर्धन विभागाने वेळ न गमावता म्हैसीच्या कानावर लावण्यात आलेल्या बिल्ल्यावरील नंबरला इमाफ पोर्टवर सर्च केले. त्यानंतर, म्हैशीचा पूर्ण बायोडाटा पशुसंवर्धन विभागाच्या हाती लागला. यामध्ये मालकाचे नाव, गाव, एवढेच नाही, तर म्हैशीचा जन्म केला झाला. याबाबतची संपूर्ण माहिती मिळाली. या माहितीनंतर पशुसंवर्धन विभागाने त्या म्हैशीच्या मालकासोबत संपर्क साधून त्याच्या स्वाधीन केले आहे. यामुळे संबंधित शेतकऱ्याला दिलासा मिळाला आहे.

बाॅक्स

काय आहे इमाफ?

प्रत्येक जनावरांची माहिती असावी, यासाठी पशुसंवर्धन विभागाने जनावरांच्या कानावर बिल्ला लावण्याची मोहीम सुरू केली आहे. यामध्ये प्रत्येक पशुंना एक नंबर दिला जातो. हा नंबर इनाफ (इन्व्हीडुल ॲनिमल हिस्ट्री सीट) यामध्ये संपूर्ण माहितीसह भरली जाते. यामध्ये मालकाचे नाव, गाव, पशूचा प्रकार, जन्मतारीख आणि त्या जनावराचा नंबर आदी सर्व राहते. यामध्ये संबंधित नंबर इनाफमध्ये सर्च केल्या, तर जनावराची सर्व माहिती एका क्लिकवर मिळते.

कोट

पशुंच्या कानावर लावलेल्या बिल्ल्यामुळे पशुंची सर्व माहिती एका क्लिकवर मिळते. हरविलेली म्हैस वरोरा येथे आढळल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने सर्च करून मालकाची संपूर्ण माहिती गोळा केली. त्यानंतर, त्याच्यासोबत संपर्क साधून ती त्याच्या सुपुर्द केली आहे. यामुळे संबंधित शेतकऱ्याचे नुकसान टळले आहे.

- डाॅ.अविनाश सोमनाथे

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि.प. चंद्रपूर

Web Title: Inaf gives the farmer a lost buffalo