कापूस बियाण्यांचे सुधारित दर स्वस्त

By Admin | Updated: June 15, 2015 01:11 IST2015-06-15T01:11:33+5:302015-06-15T01:11:33+5:30

महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने नुकताच शासन निर्णय निर्गमीत ...

Improved rates of cotton seeds are cheap | कापूस बियाण्यांचे सुधारित दर स्वस्त

कापूस बियाण्यांचे सुधारित दर स्वस्त

बियाणे विक्रीवर करडी नजर : ऐन हंगामात शेतकऱ्यांना मिळाला दिलासा
मूल: महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने नुकताच शासन निर्णय निर्गमीत करुन कापूस बियाणांचे सुधारित दर कमी केले आहे याबाबत राज्यातील सर्व कृषी विभागातील अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. कापसाचे सुधारित बियाणे स्वस्त झाल्याने शेतकऱ्यांना ऐन हंगामाच्यावेळी फार मोठा दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र शासनाने बि-बियाणे (पुरवठा, वितरण, विक्री व विक्रीच्या किंमतीचे निश्चितीकरण यांचे विनियमन) अधिनियम २००९ (२००९ चा महा. १९) च्या कलम १० नुसार प्राप्त अधिकारान्वये कापूस बियाणांचे दर कमी करण्यात आले आहेत. त्यात बिटी कॉटन बोलगार्ड- १ प्रती पॉकेट ७३० रुपये असून क्राम १ एसी इव्हेट- १ सॅन्टो ५३१ इव्हेंट) व क्राय १ एसी इव्हेंट १ या संकरीत वाणाचा समावेश आहे. बीटी कॉटन बोलगार्ड- २ मधील संकरीत कापसाचे बियाणे प्रती पॉकेट ८३० रुपये भाव निश्चित करण्यात आला आहे. यात इव्हेट क्राय १ एसी आणि क्राय २ एबी जीन्स (मोनो सॅन्टो १५९८५ इव्हेट) व क्राय १ एबी क्राय १ एसी (जीएफ १ एक) याचा समावेश आहे, तर संकरीत कापूस नॉन बीटीचे दर ५०० रुपये प्रती पॉकेट ठेवण्यात आला आहे. कापसाच्या बियाणांचे दर कमी करुन शेतकऱ्यांना ऐनवेळी हंगामाच्या वेळी दिलासा देण्याचे काम शासनाने केले असल्याचे दिसून येते.
शासनाने राज्यातील सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांना याबाबत पत्राद्वारे कळविले आहे. कापसाच्या बियाणांचे दर कमी झाल्याने आपआपल्या कार्यक्षेत्रात सुधारित दराने कापूस बियाणांची कृषी केंद्रामधून विक्री होईल, याची दक्षता घेण्याबाबत सर्तक रहावे, अशा सुचना केल्या आहेत. जुन्या दराने विक्री होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यावर आता कृषी विभागाची करडी नजर राहणार आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Improved rates of cotton seeds are cheap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.