शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2016 00:37 IST2016-08-28T00:37:48+5:302016-08-28T00:37:48+5:30

जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत शाळेचा शैक्षणिक दर्जा सुधारावा, विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आवड निर्माण व्हावी,...

To improve the educational status of schools | शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारणार

शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारणार

संपर्क अधिकारी नियुक्त : महिन्याच्या पहिल्या सोमवारी शाळेचा ड्रा 
चंद्रपूर : जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत शाळेचा शैक्षणिक दर्जा सुधारावा, विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आवड निर्माण व्हावी, शाळेचा परिसर आल्हादायक, नयनरम्य व आरोग्यदायी रहावा, विद्यार्थ्यांना आनंदी वातावरणात शिक्षण घेता यावे, यासाठी प्रत्येक तालुक्यात संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. महिन्यातील एका बुधवारी शाळेला भेट देवून तो सर्वांगाने शाळेचे निरीक्षण करून शाळेचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न करणार आहे.
जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.डी. सिह यांनी शैक्षणिक क्षेत्रात अमूलाग्र बदल व्हावा, जि.प.च्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आनंददायी वातावरण निर्माण करण्यासाठी शाळेला कुठल्या सोयी सुविधेची गरज आहे, यासाठी प्रत्येक तालुक्यात जि.प. च्या विभाग प्रमुख यांना तालुका संपर्क अधिकारी म्हणून तालुके दत्तक दिले आहे. याच्यामार्फत पंचायत समिती स्तरावर संपर्कात राहून विविध योजनांचा आढावा घेऊन योजनेची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.
त्यानुसर शिक्षण विभागासाठी प्रत्येक तालुक्याच्या नेमण्यात आलेल्या संपर्क अधिकारी यांच्या नेतृत्त्वात एक समिती गठीत करून या समितीत जिल्हास्तरीत विभाग प्रमुख, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांचा समावेश राहिल. या समितीचीे जिल्हा परिषदेला जिल्हास्तरावर महिन्याच्या पहिल्या सोमवारी बैठक घेऊन ड्रा काढला जाईल, या ड्रामध्ये ज्या शाळांचे नाव निघणार, त्या शाळेला या समिती अंतर्गत बुधवारी भेट देऊन तपासणी केली जाईल. यामध्ये विविध अंगाने शालेय सोयी सुविधा, शिक्षणाचा दर्जा, शाळा व्यवस्थापन समितीची बैठक, शाळा परिसराची पाहणी, शाळेत अस्तित्वात असलेल्या सोई सुविधांची पाहणी, प्लॅस्टिक निर्मूलन, भौतिक सुविधा, शाळेचे मैदान, शालेय शौचालय, मुतारी, पिण्याच्या पाण्याची सुविधा, शैक्षणिक सुविधा, दैनिक परिपाठ, शालेय पोषण आहार, गणवेश व पाठ्यपुस्तक, विविध शालेय उपक्रम, शालेय मुलींवर होणारे अत्याचार यावरसुद्धा या समितीद्वारा लक्ष केंद्रित केले जाणार आहे. (शहर प्रतिनिधी)

जिल्हा परिषद शाळेकरिता हा उपक्रम जिल्ह्यात प्रथमच राबविला जात आहे. याद्वारे शाळा शैक्षणिकदृष्टया मजबूत होऊन प्रत्येक विद्यार्थ्यांला आनंददायी व खेळीमेळीच्या वातावरणात जीवन कौशल्य निर्माण करण्याचे धडे मिळेल व तो उद्याचा चांगला नागरिक होईल. यासाठी हा प्रयत्न आहे.
- देवेंदर सिंह
मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद, चंद्रपूर

Web Title: To improve the educational status of schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.