शाळांमध्ये लवकरच आकृतीबंध लागू होणार

By Admin | Updated: May 18, 2014 00:13 IST2014-05-18T00:13:16+5:302014-05-18T00:13:16+5:30

बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २00९ नुसार प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये लवकरच नवीन आकृतीबंध लागू होणार आहे.

Implementation of schools will be implemented soon | शाळांमध्ये लवकरच आकृतीबंध लागू होणार

शाळांमध्ये लवकरच आकृतीबंध लागू होणार

पेंढरी(कोके) : बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २00९ नुसार प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये लवकरच नवीन आकृतीबंध लागू होणार आहे.

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने नुकतीच सभा घेतली. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २00९ प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये नैसर्गिक वाढीने इयत्ता पाचवी व आठवीचे वर्ग सन २0१४ पासून सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षण संचालक (प्राथमिक) शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे शिक्षण विभागाने सादर केला आहे.

याबाबत नैसर्गिक वाढीचे निर्णय शासन स्तरावरुन लवकरच निर्गमीत करण्यात येणार असल्याचे समजते. माध्यमाचा वर्ग नाही अशा शाळांमध्ये पाचवीचा वर्ग जोडणे व ज्या ठिकाणी इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत शाळा आहे व तीन किमी परिसरात आठवीचा त्याच माध्यमाचा वर्ग नाही अशा शाळांमध्ये आठवीचा वर्ग जोडण्याबाबत गटशिक्षणाधिकार्‍यांनी शिफारस केलेल्या शाळेनी इयत्ता चवथी, सातवीमधील संबंधित विद्यार्थ्यांचे शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र सदर शाळेच्या मुख्याध्यापकांनी देण्याची कार्यवाही करू नये, असे सांगितले आहे. मात्र सदर विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र देण्याची विनंती केल्यास त्यांना शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र द्यावे, असे आदेशात स्पष्ट नमूद केले आहे.

ज्या खासगी माध्यमिक शाळेचे आठवीचे वर्ग तुटून कर्मचारी अतिरिक्त होतील त्यांच्या समायोजनाचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे. तसेच प्रत्येक शाळेत विद्यार्थी पटसंख्येचा प्रश्न भेडसावणार आहे. (वार्ताहर)

Web Title: Implementation of schools will be implemented soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.