अवैध वीज कनेक्शनमुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम
By Admin | Updated: November 17, 2014 22:49 IST2014-11-17T22:49:25+5:302014-11-17T22:49:25+5:30
जिल्ह्यातील काही गावांमध्ये असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या डीपीमध्ये अवैध वीज कनेक्शन लावण्यात आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम पडत आहे. एवढेच नाही तर याबाबात वीज वितरण

अवैध वीज कनेक्शनमुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम
चंद्रपूर : जिल्ह्यातील काही गावांमध्ये असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या डीपीमध्ये अवैध वीज कनेक्शन लावण्यात आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम पडत आहे. एवढेच नाही तर याबाबात वीज वितरण कंपनीला माहित आहे. त्यांनीच आपल्याला माहिती दिली असल्याचे उत्तर देऊन खळबळ उडवून टाकणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे ना. हंसराज अहीर यांच्यासह उपस्थित अधिकारी चांगलेच चक्रावले.
जिल्हा परिषदेमध्ये ना. अहीर यांनी सोमवारी आढावा सभा घेतली. यावेळी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरामुळे मंत्रीमदोहय चांगलेच संतापले. एवढेच नाही तर जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.मंत्रीमहोदयांनी जिल्ह्यातील पाणी पुरवठ्याबाबतची आजची स्थिती विचारून किती योजना सुरु आहे, कोणत्या योजना बंद आहे. याबाबत माहिती विचारली. मात्र पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी अवैध वीज कनेक्शनमुळे गावातील पाणी पुरवठ्यावर परिणाम पडत असल्याचे सांगितले. एवढेच नाही तर पाणी पुरवठा विभागाची स्वतंत्र डीपी असतानाही त्यामधून शेतकरी आणि काही नागरिकांनी अवैध कनेक्शन घेतल्याची माहिती आहे. यासंदर्भात आपल्याला वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले. जर अवैध कनेक्शन आहे आणि पाणी पुरवठा विभागाची स्वतंत्र डीपी आहे तर तक्रार करण्यास अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष का, असा प्रश्न यानिमित्ताने पडला. थातुरमातूर उत्तर देण्याची सवय लागलेल्या अधिकाऱ्यांमुळे अनेक योजनांचा बट्याबोळ उडत असल्याचे दिसले.(नगर प्रतिनिधी)