अशैक्षणिक कामांमुळे अध्यापनावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 23:56 IST2017-12-12T23:55:59+5:302017-12-12T23:56:16+5:30

शिक्षकांचे कार्यच मुळात विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन ज्ञानी करण्याचे आहे. गावखेडी आणि दुर्गम भागातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवरच आहे.

Impact on teaching due to non-teaching activities | अशैक्षणिक कामांमुळे अध्यापनावर परिणाम

अशैक्षणिक कामांमुळे अध्यापनावर परिणाम

ठळक मुद्देसुधाकर अडबाले : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : शिक्षकांचे कार्यच मुळात विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन ज्ञानी करण्याचे आहे. गावखेडी आणि दुर्गम भागातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवरच आहे. मात्र, शिक्षकांवर शाळाबाह्य कामे लादून त्यांची अध्यापनक्षमता नष्ट करीत आहे. हा प्रकार तातडीने बंद करावी, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेने जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
शिक्षकांना अध्यापनाच्या पलिकडची कामे दिली जात आहे. या अशैक्षणिक कामांमुळे विद्यार्थ्यांना कसे शिकविणार, हा प्रश्न निर्माण झाला. शासनाने माध्यमिक शाळेतील शिक्षकांना बीएलओ बुथ आॅफीसर ही अत्यंत किचकट स्वरूपाची जबाबदारी सोपविली. हे अशैक्षणिक काम करण्याचा आदेश जारी करण्यात आला. शासनाच्या विविध जबाबदाºया शिक्षकांवर सोपवून शासन अन्याय करीत आहे. हा प्रकार बंद करून शासनाने शिक्षकांना अध्यापनापलिकडे कामे सोपवू नये, अशी मागणी संघटनेने या निवेदनातून केली आहे.
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांना निवेदन देताना जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, जिल्हा कार्यवाह श्रीहरी शेंडे, कार्याध्यक्ष लक्ष्मण धोबे, उपाध्यक्ष दिगांबर कुरेकार, सुनील शेरकी, विजय टोंगे, प्रभाकर पारखी, सुरेंद्र अडबाले व अन्य शिक्षक उपस्थित होते.

शिक्षकांना अशैक्षणिक कामांची सक्ती केली जाणार नाही. असे प्रकार घडल्यास आपल्या अधिकार क्षेत्रातील संबंधित आदेश तत्काळ रद्द करण्यात करू.
- आशुतोष सलील,
जिल्हाधिकारी

Web Title: Impact on teaching due to non-teaching activities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.