विसर्जन आपल्या दारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:34 IST2021-09-16T04:34:40+5:302021-09-16T04:34:40+5:30

चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेद्वारे यंदा पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा केला जात आहे. उत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी टाळण्याकरिता महापालिका ...

Immersion your door | विसर्जन आपल्या दारी

विसर्जन आपल्या दारी

चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेद्वारे यंदा पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा केला जात आहे. उत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी टाळण्याकरिता महापालिका प्रशासनातर्फे ‘विसर्जन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी झोननिहाय ‘फिरत्या विसर्जन कुंडांची’ व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकदेखील या सुविधेचा पुरेपूर लाभ घेत असून उत्स्फूर्तपणे गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम कुंडांत करत आहेत.

या फिरत्या विसर्जन कुंडांचे झोननिहाय मार्गक्रमण वेळापत्रक आणि संपर्क क्रमांकदेखील महापालिकेद्वारे देण्यात आलेले आहेत. मनपातर्फे पुरविण्यात आलेल्या या घरपोच सुविधेमुळे अत्यंत शांतीपूर्ण व भक्तिमय वातावरणात भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत. आपल्या परिसरातील विसर्जन रथाची माहिती घेण्याकरिता पुढील क्रमांकांवर संपर्क साधता येईल.

झोन १ - ९८८१५९०४०२

झोन २- ९६६५४०३९९४

झोन ३ - ९६०७८४८६४८

Web Title: Immersion your door