तातडीने पंचनामे करा अन्यथा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 06:00 IST2019-11-02T06:00:00+5:302019-11-02T06:00:39+5:30
यंदाच्या खरीप हंगामात सुरूवातीला पावसाने दगा दिला होता. परंतु नंतरच्या कालावधीत पावसाने सरासरी गाठल्याने पिकांना जीवदान मिळाले. शेतात धान डोलू लागले. दिवाळीपूर्वी कमी कालावधीच्या धानाची कापणी करण्यात आली. पुंजणे तयार करण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी लागतो. याच सुमारास पाऊस झाल्याने कडपा भिजल्या. जड धान अजूनही शेतात उभे आहे.

तातडीने पंचनामे करा अन्यथा आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: अवकाळी पावसामुळे कापूस, सोयाबीन, ज्वारीसह विविध पिके संकटात सापडले. सरकारने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देणे अपेक्षित असताना अद्याप पंचनामे सुरू करण्यात आले नाही. परतीच्या पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत व आधार देण्याचे सोडून हे सरकार फक्त सतेच्या खुर्चीसाठी दंग आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.
यंदाच्या खरीप हंगामात सुरूवातीला पावसाने दगा दिला होता. परंतु नंतरच्या कालावधीत पावसाने सरासरी गाठल्याने पिकांना जीवदान मिळाले. शेतात धान डोलू लागले. दिवाळीपूर्वी कमी कालावधीच्या धानाची कापणी करण्यात आली. पुंजणे तयार करण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी लागतो. याच सुमारास पाऊस झाल्याने कडपा भिजल्या. जड धान अजूनही शेतात उभे आहे.
२९ ऑक्टोबर रोजी झालेल्या परतीच्या पावसामुळे धान पीक आडवे पडून नष्ट होत आहे. दरवर्षी दुष्काळाचा सामना करणाºया शेतकऱ्यांना अधिक पीक येणार असल्याने धीर आला होता. परंतु, अवकाळी व परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचा धीर खचू लागला आहे.
धान, सोयाबीन, कापूस, ज्वारीसह अनेक पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. शेतकरी संकटात सापडला असून शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली. मात्र, सरकारच्या वतीने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत न देता वाऱ्यावर सोडत आहे. अवकाळी पावसामुळे विदर्भासह राज्यातील खरीप हंगामातील सर्व पिके नष्ट होत असल्याने तातडीने पंचनामे करणे आवश्यक होते. प्रशासनातील अनेक अधिकारी व कर्मचारी दिवाळीनिमित्त सुट्टीवर असल्याने पंचनामे कोण करणार, असा प्रश्नही आमदार वडेट्टीवार यांनी विचारला आहे.