निरामय भारतासाठी आयएमएचा सत्याग्रह
By Admin | Updated: November 11, 2015 00:40 IST2015-11-11T00:40:48+5:302015-11-11T00:40:48+5:30
इंडियन मेडिकल असोसिएशन या वैद्यकीय व्यवसायिकांच्या अखिल भारतीय संघटनेने निरामय भारतासाठी आय.एम.ए.चा १६ नोव्हेंबरला देशव्यापी आंदोलन असल्याची माहिती ...

निरामय भारतासाठी आयएमएचा सत्याग्रह
आमदारांना निवेदन : पत्रपरिषदेत माहिती
ब्रह्मपुरी : इंडियन मेडिकल असोसिएशन या वैद्यकीय व्यवसायिकांच्या अखिल भारतीय संघटनेने निरामय भारतासाठी आय.एम.ए.चा १६ नोव्हेंबरला देशव्यापी आंदोलन असल्याची माहिती आय.एम.ए. हॉल मध्ये झालेल्या पत्रपरिषदेत दिली. यासंदर्भात आय.एम.ए.च्या पदाधिकाऱ्यांनी आमदार विजय वडेट्टीवार यांना निवेदन दिले.
पत्रपरिषदेत माहिती देताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले, सत्याग्रहाचा हा निर्णय स्वीकारण्यामागे जी अनेक कारणे आहेत, त्यामध्ये पाच मुख्य ज्वलंत प्रश्न आहेत. डॉक्टर्स आणि रुग्णालय यांच्या संरक्षणाबाबत झालेल्या कायद्याची अंमलबजावणी, वैद्यकीय व्यवसायिकांवरील खटल्यामध्ये मागणी केली जात असलेल्या दंडात्मक अवास्तव रकमेवर निर्बंध, रुग्णालये आणि दवाखाने या बाबत होऊ घातलेल्या अन्यायकारक कायदा, भ्रृणहत्या प्रतिबंधक कायद्याद्वारे डॉक्टरांवर होणाऱ्या कारवाईमध्ये बदल, डॉक्टरांनी ज्या वैद्यकीय शाखेमध्ये शिक्षण घेतले असेल, फक्त त्यामध्येच वैद्यकीय सेवा करावी या प्रमुख मागण्यांसह वैद्यकीय आस्थापना कायदा (क्लिनिकल एस्टॉब्लिसमेंट अॅक्ट) केंद्र सरकारने आरोग्यासाठी अंदाजपत्रकात भरीव तरतूद करावी इ. मागण्यांसाठी संघटनेने देशव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिला. पत्रपरिषदेला अध्यक्ष डॉ.खिजेंद्र गेडाम, सचिव डॉ.भारत गणवीर, डॉ.लक्ष्मीकांत लाडूकर, डॉ.नाकाडे, डॉ.अतूल नागरे, डॉ.विश्राम नाकाडे, डॉ.रविशंकर आखरे, डॉ.नारिंगे, डॉ.सावजी, डॉ.माणिक खुणे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)