आयएमएतर्फे जागतिक मेंदू दिन साजरा
By Admin | Updated: July 28, 2015 02:17 IST2015-07-28T02:17:11+5:302015-07-28T02:17:11+5:30
जागतिक मेंदू दिनाचे औचित्य साधुन इंडियन मेडीकल असोसिएशन, आरोग्य भारती रोटरी क्लब चंद्रपूर, रोटरी चांदा

आयएमएतर्फे जागतिक मेंदू दिन साजरा
चंद्रपूर : जागतिक मेंदू दिनाचे औचित्य साधुन इंडियन मेडीकल असोसिएशन, आरोग्य भारती रोटरी क्लब चंद्रपूर, रोटरी चांदा फोर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिरगी’ या विषयावर शनिवारी मोफत जाणिव जागृती कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात आजाराचे निदान व उपचार याबद्दल नागपूरचे मेंदू व मिरगी रोगतज्ज्ञ डॉ. निरज बाहेती यांनी माहिती दिली. यामध्ये मिरगी कोणकोणत्या प्रकारची असते व मिरगी बद्दल रुग्णांनी घ्यावयाची काळजी याची चर्चा करण्यात आली. स्थानिक आय.एम.ए. हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी आय.एम.ए. चे अध्यक्ष डॉ. अशोक भुक्ते, आयएमएचे सचिव डॉ. प्रसाद पोटदुखे व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)