अवैध वृक्षतोड करणाऱ्याला अटक
By Admin | Updated: July 27, 2016 01:15 IST2016-07-27T01:15:01+5:302016-07-27T01:15:01+5:30
वनविकास महामंडळातील कन्हाळगाव वनपरिक्षेत्रातील कुडेसावली बिटातील कक्ष क्र.९ मध्ये अवैधरित्या सागवान वृक्षतोड ...

अवैध वृक्षतोड करणाऱ्याला अटक
कुडेसावली बिटची घटना : वनविकास महामंडळातील प्रकार
कोठारी : वनविकास महामंडळातील कन्हाळगाव वनपरिक्षेत्रातील कुडेसावली बिटातील कक्ष क्र.९ मध्ये अवैधरित्या सागवान वृक्षतोड करताना एका इसमास वनकर्मचाऱ्यांनी रंगेहात अटक केली. भोपााल कवडू रंगारी रा. कुडेसावली असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे.
मागील अनेक दिवसांपासून कुडेसावली बिटातील विविध कक्षात अवैध वृक्षतोड होत आहे. यापूर्वी याच गावातून चार जणांना अवैध सागवान लाकडासह अटक झाली होती. यापासून येथील अवैध सागवान चोरट्यांनी धडा घेतला नाही. पुन्हा जोमात वृक्षतोड करुन वनकर्मचाऱ्यांना हैराण करुन सोडले आहे. अशात २६ जुलैला जंगलात गस्त करीत असलेल्या वनकर्मचाऱ्यांना कन्हाळगाव वनपरिक्षेत्रात कक्ष क्र. ९ मध्ये सागवान वृक्षाची कटाई करीत असल्याचा सुगावा लागला. त्यांनी भोपाल रंगारी यास लाकडासह रंगेहाथ अटक केली.
अटक केलेल्या आरोपीला गोंडपिंपरी येथील न्यायालयात हजर करण्यात आले . पुढील चौकशीत किती प्रमाणात जंगलतोड करण्यात आली याचा तपास करण्यात येणार आहे. यात वनाधिकारी प्रफुल्ल निकोडे, सहा व्यवस्थापक प्रफुल्ल वाघ यांच्या मार्गदर्शनात तपास करीत आहेत. क्षेत्र सहाय्यक विपूल आत्राम, वनपाल संभाजी कोडेवार, वनरक्षक साबळे आदींनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली.
कुडेसावली बिटातील नियत क्षेत्रात सागवान वृक्षांचे उच्च दर्जाचे जंगल असून त्याकडे अवैध वृक्षतोडणाऱ्यांचे विशेष लक्ष आहे. वनविकास महामंडयाचे कर्मचारी नावापुरते जंगल संरक्षणाकडे रस घेत असतात. जंगल गस्तीचे कारण पुढे करुन स्वत:चे खासगी कामात मग्न असतात. त्याचाच फायदा लाकुड तोडणारे उचलत असतात. परिणामी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मौल्यवान सागवानाची जंगलातच हातकटाई करुन फर्निचर दुकानदारांना पुरवठा करतात. (वार्ताहर)