शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

ट्रकमध्ये कोंबून जनावरांची अवैध वाहतूक; दोघांना अटक

By परिमल डोहणे | Updated: September 11, 2022 19:32 IST

रविवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास केलेल्या या कारवाईत सावली पोलिसांनी साडेबारा लाखांच्या मुद्देमालासह दोघांना अटक केली आहे. यंदाची सावली पोलिसांची ही अकरावी कारवाई आहे. 

चंद्रपूर : ट्रकमध्ये कोंबून जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याच्या माहितीवरून सावली पोलिसांनी चंद्रपूर गडचिरोली महामार्गावर नाकाबंदी करून २५ जनावरांची सुटका केली. रविवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास केलेल्या या कारवाईत सावली पोलिसांनी साडेबारा लाखांच्या मुद्देमालासह दोघांना अटक केली आहे. यंदाची सावली पोलिसांची ही अकरावी कारवाई आहे. 

बक्षीस सिंग मुक्तार सिंग (४२) रा. खदूरसाहिब जि. करणतारण पंजाब), मोहम्मद आरिश मोहम्मद कुरेशी (२२, रा. बनत, ता. जि. शामली, उत्तर प्रदेश) असे अटकेतील आरोपींचे नाव आहे. ट्रकमध्ये कोंबून जनावराची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार आशिष बोरकर यांना मिळाली. त्यांनी लगेच आपल्या पथकाच्या सहाय्याने चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावर नाकाबंदी केली. यावेळी सीजी ०४ जेबी ७६४९ क्रमाकांचा संशयित ट्रकला थांबवून तपासणी केली. यावेळी वाहनात जनावरे कोंबून असल्याचे दिसून आले. 

पोलिसांनी त्या ट्रकसह साडेबारा लाखांचा मुद्देमाल जप्त करून दोघांवर महा. पशुसंरक्षण अधिनियम, प्राणी छळ प्रति. अधि, महा. पोलीस अधि., मोटर वाहन कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे, सावली ठाणेदार आशिष बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली दर्शन लाटकर, मोहन दासरवार, धीरज पिदूरकर यांनी केली.

टॅग्स :cowगाय