गांगलवाडी भागात अवैध दारूविक्री

By Admin | Updated: April 23, 2017 01:03 IST2017-04-23T01:03:54+5:302017-04-23T01:03:54+5:30

गांगलवाडी परिसरातील तळोधी खुर्द, गोगाव, हळदा, मुडझा, आवळगाव, वांद्रा, रूई, निलज, पाचगाव येथे मोठ्या प्रमाणात

Illegal liquor in the area of ​​Gangalwadi | गांगलवाडी भागात अवैध दारूविक्री

गांगलवाडी भागात अवैध दारूविक्री

गांगलवाडी : गांगलवाडी परिसरातील तळोधी खुर्द, गोगाव, हळदा, मुडझा, आवळगाव, वांद्रा, रूई, निलज, पाचगाव येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री खुलेआम सुरू आहे. त्यामुळे या भागातील युवा वर्ग, शेतकरी, शेतमजूर व इतर नागरिक मोठ्या प्रमाणात दारूच्या आहारी जात असून त्यांचे संसार उद्ध्ववस्त होत आहेत.
या भागात गावागावात भांडण तंटे वाढत आहेत. त्यामुळे या भागातील अवैध दारू विक्री त्वरित बंद करावी व या अवैध दारू विक्रेत्यांना पोलीस विभागाने जेरबंद करावे, अशी मागणी तळोधी खुर्द ग्रामपंचायतीचे सदस्य भाऊराव हरिभाऊ ठवकर यांनी केली आहे.
तळोधी खुर्द येथील अवैध दारू विक्रेते स्वैर झाले आहेत. माझे कोण काय बिघडवू शकतो, या तोऱ्यात ते मिरवीत आहे. तसेच येथील नागरिकांनी या अवैध दारू विक्रेत्याला समज दिली असता तो त्यांच्याशी असभ्य वर्तन करून गुंडागर्दीच्या जोरावर येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री करीत आहे. परंतु पोलीस विभाग मात्र मूग गिळून बसलेला दिसतो. या अवैध दारूविक्रीमुळे येथील युवा पिढी बिघडत असून येथील संसार उद्ध्वस्त होत आहेत.
पोलीस विभागाने या भागातील अवैध दारूविक्री त्वरित बंद करावी अन्यथा या अवैध दारू विक्रीविरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाऊराव ठवकर व गावकऱ्यांनी दिला आहे. (वार्ताहर)

Web Title: Illegal liquor in the area of ​​Gangalwadi