शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

घाटावरून रेतीचा अवैध उपसा

By admin | Updated: November 6, 2014 01:19 IST

तालुक्यातील धानोरा महसूली साज्यांतर्गत येत असलेल्या नलफडी घाटावरून मोठ्या प्रमाणावर रेतीचा अवैधरित्या उपसा केला जात आहे.

राजुरा : तालुक्यातील धानोरा महसूली साज्यांतर्गत येत असलेल्या नलफडी घाटावरून मोठ्या प्रमाणावर रेतीचा अवैधरित्या उपसा केला जात आहे. या नाल्यातून दररोज शेकडो ब्रास रेतीची अवैधपणे उचल करण्यात येत आहे. हा गोरखधंदा मागील काही दिवसांपासून अविरतपणे सुरु असला तरी महसूल विभागाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. या घाटावरून अनेकदा रेतीची चोरी होऊनदेखील एकही कारवाई झाली नाही. त्यामुळे या गोरखधंद्यात महसूल विभागातील काही अधिकारी-कर्मचाऱ्यांचे हात ओले होत असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. रेतीच्या चोरीमुळे शासनाचा हजारो रुपयांचा महसूल बुडत आहे. पण महसूल अधिकारी मात्र मूग गिळून गप्प बसल्याने त्यांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.राजुरा तालुक्यात अनेक रेतीघाट आहेत. राजुरा, धोपटाळा, कापनगाव, टेंबूरवाही, विहीरगाव, नलफडी, कवीठपेठ, विरुर स्टेशन, खांबाडा यासह इतर रेतीघाटांच्या लिलावातून शासनाला लाखोंचा महसूल प्राप्त होतो. पण खांबाडा घाट वगळता मागील काही वर्षांपासून एकाही घाटाचा लिलाव झाला नसल्याने ही बाब माफियांच्या पथ्यावर पडत आहे. या गोरखधंद्यासाठी माफिया हप्ता देत असल्याने त्यांना खुली सूट देण्यात येत आहे. या संधीचा फायदा घेत माफियांनी अक्षरश: नाल्याची पुरती वाट लावली आहे. रेतीमाफियांनी विहिरगाव घाटातील शेकडो ब्रास रेतीवर डल्ला मारल्यानंतर आता त्यांनी नलफडी घाटावर हल्लाबोल केला आहे. हा घाट जंगलाला लागून असल्याने यामध्ये मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा आहे. याच संधीचे सोने करण्यासाठी माफियांनी घाटात धुडगूस घातला आहे. चार-पाच माफियांच्या अंदाजे सहा ट्रकमधून राजरोसपणे रेतीचा उपसा करण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांना हप्ता देतो या तोऱ्यातत त्यांची अरेरावी सुरु आहे. अंदाजे एक किमीपर्यंतचा नाला खोदून काढला आहे. आजतागायत या साज्याच्या तलाठ्याने एकाही ट्रकवर कारवाई केल्याचे दिसून येत नाही. या धंद्यात त्यांचे हातसुद्धा ओले असल्याची चर्चा आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना पूर्वसूचना न देता फिल्डिंग लावून या माफियांच्या मुसक्या आवळाव्या, अशी मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)