चिमूर बसस्थानकापुढेच अवैध प्रवासी वाहतूक

By Admin | Updated: February 22, 2015 01:00 IST2015-02-22T01:00:08+5:302015-02-22T01:00:08+5:30

प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रिद वाक्य घेऊन सेवेत रूजू झालेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे चिमूर येथे आगार आहे. परंतु या आगारासमोरच अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

Illegal commute traffic from Chimur Bus Station | चिमूर बसस्थानकापुढेच अवैध प्रवासी वाहतूक

चिमूर बसस्थानकापुढेच अवैध प्रवासी वाहतूक

चिमूर : प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रिद वाक्य घेऊन सेवेत रूजू झालेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे चिमूर येथे आगार आहे. परंतु या आगारासमोरच अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आमिष दाखवित प्रवाशांना आकर्षित केले जाते. यामुळे महामंडळाला लाखो रुपयांचा फटका बसत आहे.
वरोरा-चिमूर-काम्पा हा राज्य महामार्ग आहे. या राज्यमार्गावरच चिमूर आगार आहे. चिमूर हे तालुक्याचे स्थान आहे. त्यामुळे रोज हजारो प्रवाशी ये-जा करतात. प्रवाशाची रेलचेल बघता अवैध प्रवासी वाहतूक फोफावली आहे. परंतु हे अवैध प्रवासी वाहतूक करणारे चिमूर आगाराच्या मुख्य दरवाजाावरच आपली वाहने उभे करून प्रवाशांची ने-आण करतात. आजघडीला चिमूर येथे दहा खाजगी ट्रॅव्हल्स, शंभराहून अधिक ट्रॅक्स-कमांडर, ५० आॅटो धावत आहे. या सर्व वाहन चालक मुख्य दरवाजावर येऊन प्रवाशांना आवाज देत असतात. यासोबतच प्रवाशांना बोलविण्यासाठी वाहनाचे कर्कश हार्न वाजवित असतात.
या मुख्य मार्गावरच तहसील कार्यालय आहे. या तहसील कार्यालयाच्या गेटजवळच अवैध प्रवाशी वाहने उभे राहतात. वाहनाच्या आवाजाने व कर्णकर्कश हार्नने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. तहसिल कार्यालयाचा परिसर हा शांतता झोन म्हणून ओळखला जातो. परंतु या नियमाचे सऱ्हास उल्लंघन होत आहे.
चिमूर शहरातील मुख्य राज्य महामार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे राज्य महामार्गावरुन एकेरी वाहतूक सुरू आहे. अवैध प्रवासी वाहन येथेच उभे राहतात तर काही अवैध प्रवासी वाहन येथूनच वळण घेतात. त्यामुळे इतर वाहनाला व पदचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. बसस्थानकाच्या मुख्य दरवाजापासून २०० मीटर अंतराच्या आत आपली वाहने उभे करू शकत नाही. परंतु या नियमांचे उल्लंघन वारंवार होत असताना दिसून येत आहे.
याबाबत आगार व्यवस्थापक ए.एम. मेश्राम यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, महामंडळाच्या बसच्या २९६ फेऱ्यांची व्यवस्था केली आहे. त्यात ४३ फेऱ्या या तोट्यात आहेत. त्यामुळे लाखो रुपयांचा फटका आगाराला बसत आहे. अवैध प्रवाशी वाहनावर कारवाई करण्याचे अधिकार महामंडळाला नाही. त्यामुळे या संदर्भात पोलिसांकडे वारंवार तक्रार केल्या जाते. परंतु या तक्रारीची दखल घेतली जात नाही.
तहसील कार्यालयाच्या गेटवरच अवैध प्रवासी वाहन उभे राहत असल्याने येथील तहसीलदार तळपाडे यांनी याबाबत चिमूर पोलीस स्टेशनला लेखी माहिती देऊन तेथील वाहने हटविण्याचे आदेश दिल. परंतू या आदेशाचेही अजूनपर्यंत पालन झाल्याचे दिसून येत नाही. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Illegal commute traffic from Chimur Bus Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.