बेकायदेशीररीत्या केबल प्रसारणाचा व्यवसाय

By Admin | Updated: September 16, 2015 01:05 IST2015-09-16T01:05:05+5:302015-09-16T01:05:05+5:30

मागील १५ वर्षापासून ब्रह्मपुरी शहरात केबलचा व्यवसाय सुरू असताना त्यांना सेवेपासून मुक्त करण्याचा डाव युसीएन कंपनीने रचून आपला बेकायदेशीर व्यवसाय सुरु केला आहे.

Illegal business of cable transmission | बेकायदेशीररीत्या केबल प्रसारणाचा व्यवसाय

बेकायदेशीररीत्या केबल प्रसारणाचा व्यवसाय

कार्यवाही करण्याची मागणी : जिल्हाधिकारी व तहसीलदारांकडे तक्रार
ब्रह्मपुरी : मागील १५ वर्षापासून ब्रह्मपुरी शहरात केबलचा व्यवसाय सुरू असताना त्यांना सेवेपासून मुक्त करण्याचा डाव युसीएन कंपनीने रचून आपला बेकायदेशीर व्यवसाय सुरु केला आहे. कोणतीही परवानगी न घेता आपला व्यवसाय भरभराटीस आणून शासनाची दिशाभूल केली असल्याने युसीएन कंपनीवर कठोर कार्यवाही करावी व आम्हाला न्याय मिळवून देण्यात यावा याबाबत शहरातील केबल चालकांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.
शहरातील संपूर्ण केबलधारक मागील १५ वर्षापासून ब्रह्मपुरी शहराला सेवा देत आहेत. त्या व्यवसायासाठी आवश्यक परवाना जिल्हाधिकारी चंद्रपूर व जिल्हा पोस्टमास्तर चंद्रपूर यांच्याकडून घेतला आहे. तसेच सरकारचा मनोरंजन कर वेळोवेळी भरत आहेत. सदर वाहिन्यांचे प्रसारण युसीएन केबल नेटवर्क कंपनी नागभीड द्वारे केले जात होते. परंतु अचानक कंपनीने एकाधिकार शाहीचा वापर करुन मासिक शुल्कात मोठी वाढ केली. ती भरण्याचे एक मोठे आव्हान आम्हाला पेलले नाही. किंबहूना कंपनीने आमचे म्हणणे ऐकूनही घेतले नाही व आम्हाला पूर्वसूचना न देता आमचे प्रसारण डिसेंबर २०१४ पासून बंद केले. त्यामुळे आम्ही रस्त्यावर आलो , असे केबल चालकांचे म्हणणे आहे. आम्ही स्वत:ची कंट्रोल रुम चालू केली व आपला रोजगार वाचविला असता युसीएन कंपनीने पोस्टाचा परवाना व जिल्हाधिकाऱ्यांचा परवाना न घेता विनापरवाना व्यवसाय सुरु केल्याने आमच्या व्यवसायाशी व शासनाच्या धोरणाविषयी युसीएन कंपनीने खेळ सुरु करुन बेकायदेशीर धोरण अवलंबिला आहे. या अडेलतटू व बेकायदेशीर धोरणाने आमच्या स्वतंत्र व्यवसायावर परिणाम झाला असून या कंपनीवर दंडात्मक कार्यवाही करावी व व्यवसाय बंद करण्यात यावा, अशी मागणी अनिल रणदिवे, नामदेव बंडे, युसूफ पठाण, राजीव नगराळे, अनिल बघेले, सुरेश कावळे, दिलीप मेश्राम आदी केबलचालकांनी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Illegal business of cable transmission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.