अवैध गिट्टी वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त

By Admin | Updated: January 21, 2016 01:02 IST2016-01-21T01:02:59+5:302016-01-21T01:02:59+5:30

रस्त्याच्या कामाकरिता अवैध गिट्टी उत्खनन करून ४० एमएम गिट्टी वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त करून कंत्राटदारावर कार्यवाही केली.

Illegal ballast trafficking tractor seized | अवैध गिट्टी वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त

अवैध गिट्टी वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त



जिवती : रस्त्याच्या कामाकरिता अवैध गिट्टी उत्खनन करून ४० एमएम गिट्टी वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त करून कंत्राटदारावर कार्यवाही केली. ट्रॅक्टर जिवती तहसील कार्यालयात जप्त करण्यात आला असून ही कार्यवाही जिवतीचे मंडळ अधिकारी चंद्रशेखर तेलंग व त्यांच्या चमूने केली.
सारंगापूर रस्ता खडीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी कंत्राटदाराने अवैध गिट्टी उत्खनन करून वाहतूक करीत होता. या कामावर जिवतीचे मंडळ अधिकारी चंद्रशेखर तेलंग व त्यांच्या चमूने प्रत्यक्ष भेट दिलाी. तेव्हा रस्त्याच्या कामाकरीता वापरलेली ४० एमएम गिट्टी २९ ब्रॉस व गिट्टी भरून असलेला एमएच ३४ - एल ८७५१ क्रमांकाचा ट्रॅक्टर जप्त केला.
घटनेचा पंचनामा करून कंत्राटदारावर ३ लाख १६०० रुपयाचा दंड आकारण्यात आला असून ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Illegal ballast trafficking tractor seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.