कोरपन्यातील ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 05:00 IST2020-07-20T05:00:00+5:302020-07-20T05:00:53+5:30

स्वातंत्र्याच्या अनेक दशकानंतरही सदर ऐतिहासिक पाऊलखुणा दुर्लक्षित पडल्या आहे. त्यासंदर्भात पुरातत्त्व विभागाकडे साधी नोंद ही उपलब्ध नाही. यामुळे सदर वारसा दुर्लक्षित पडला आहे. त्याच्या जतनाच्या दृष्टीन पुरातत्व विभागांनी लक्ष द्यावे व वारसा जपला जावा, या भागात संशोधन व्हावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Ignoring the historical heritage of Korpana | कोरपन्यातील ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित

कोरपन्यातील ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित

ठळक मुद्देपुरातत्व विभागाकडे नोंदच नाही : ऐतिहासिक वास्तूचे जतन करणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : तालुक्यात गौरवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक ऐतिहासिक वास्तू व पाऊलखुणा आहेत. मात्र त्याचे जतन योग्य रीतीने होत नाही. शिवाय पुरातत्त्व विभागाच्या दप्तरी साधी नोंदसुद्धा नाही. त्यामुळे सदर वारसा दुर्लक्षित पडला आहे. त्याचे जतन करण्यात यावे, अशी मागणी इतिहास प्रेमी व संशोधकांकडून होत आहे.
नैसर्गिकदृष्ट्या परिपूर्ण असलेल्या कोरपना तालुक्यात अनेक यादव कालीन, गोंडकालीन, निजाम कालीन इतिहासाची आठवण करुन देणारा वारसा आजही साक्ष देत उभा आहे. यात गोंडकालीन बुरुज रूपापेठ, चनई, दुर्गाडी, निजामकालीन इन्स्पेक्शन बंगला पारडी, वनसडी, गडचांदूर, निजामकालीन पोलीस स्टेशन, शेरज बू, निजामकालीन जकात नाका कोडशी बु, पुरातन राम मंदिर अंतरगाव बु, हिमयुगिन गुफा कारवाई (सांगोडा), जुना देवघाट हनुमान मंदिर परिसरात अनेक देवताच्या मुर्त्या आदी बाबी आहे.
मात्र स्वातंत्र्याच्या अनेक दशकानंतरही सदर ऐतिहासिक पाऊलखुणा दुर्लक्षित पडल्या आहे. त्यासंदर्भात पुरातत्त्व विभागाकडे साधी नोंद ही उपलब्ध नाही. यामुळे सदर वारसा दुर्लक्षित पडला आहे. त्याच्या जतनाच्या दृष्टीन पुरातत्व विभागांनी लक्ष द्यावे व वारसा जपला जावा, या भागात संशोधन व्हावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Web Title: Ignoring the historical heritage of Korpana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.