शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 00:28 IST

मागील चार वर्षात भाजप सरकारने केवळ आश्वासन दिले. शेतकऱ्यांच्या समस्या जैसे थे आहेत. या देशातील जनतेला समान न्याय मिळाला पाहिजे. देशातील गोरगरीब, आदिवासी जनतेला समान वागणूक मिळाली पाहिजे. मात्र देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देनितीन राऊत : राजुरा येथे शेतकरी व कामगार मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : मागील चार वर्षात भाजप सरकारने केवळ आश्वासन दिले. शेतकऱ्यांच्या समस्या जैसे थे आहेत. या देशातील जनतेला समान न्याय मिळाला पाहिजे. देशातील गोरगरीब, आदिवासी जनतेला समान वागणूक मिळाली पाहिजे. मात्र देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी हक्कासाठी संघर्ष केला पाहिजे, असे आवाहन माजी मंत्री नितीन राऊत यांनी केले.माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य शेतकरी, कामगार मेळावा व कृषी प्रदर्शन राजुरा येथे पार पडले. यावेळी ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार नरेश पुगलिया तर विशेष अतिथी म्हणून माजी मंत्री शिवाजीराव मोघे, सत्कारमूर्ती माजी आमदार प्रभाकर मामुलकर, सुमन मामुलकर तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार सुदर्शन निमकर, वामनराव कासावार, देवराव भांडेकर, जि. प. सदस्य गोदरू पाटील जुमनाके, दत्तात्रय वेगिनवार, सुधाकर कुंदोजवार, श्रीधरराव गोडे, अ‍ॅड. मुरलीधरराव धोटे, सीडीसीसी बँकेचे संचालक दिलीप नलगे, माजी जि. प. सदस्य अविनाश जाधव, गजाननराव गावंडे, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवर, शिवचंद काळे, उत्तम पेचे, साईनाथ बुचे, वसंत मांढरे, तारासिंग, जि. प. सदस्य मेघा नलगे, अ‍ॅड. अरुण धोटे आदी उपस्थित होते. अध्यक्षीय मार्गदर्शनात माजी खासदार नरेश पुगलिया यांनी भविष्यात शेतीला चांगले दिवस येणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन केले. कृषी प्रदर्शनात शेती तंत्रज्ञानावरील स्टॉल लावले होते. यावेळी प्रगत शेतकऱ्यांनी अनुभव कथन केले. त्यानंतर मुलांच्या वसतिगृहाचे उद्घाटन करण्यात आले. अभिष्टचिंतन सोहळयानिमित्त माजी आमदार प्रभाकर मामुलकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक माजी जि. प. सदस्य अविनाश जाधव, संचालन आनंद चलाख, प्रा. लाटेलवार तर आभार डॉ. संभाजी वरकड यांनी मानले.

टॅग्स :FarmerशेतकरीNitin Rautनितीन राऊत