शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
3
"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
4
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
5
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
6
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
7
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
8
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
9
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
10
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
11
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
12
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
13
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
14
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
15
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
16
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
17
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

चंद्रपूर जिल्ह्यातल्या माणिकगड किल्ल्यावरील भुयारी मार्गाकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 10:51 AM

जिवती येथील प्रसिद्ध माणिकगड किल्ल्यावर प्राचीन भुयारी मार्ग शोधण्यात जिवतीच्या वनविभागाला यश मिळाले. मात्र पुरातत्व विभागाने या प्राचीन भुयारी मार्गाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने आजही हा भुयारी मार्ग बंद अवस्थेत आहे.

ठळक मुद्देहेमाडपंथी विष्णू मंदिराला पर्यटकांची भेट

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : जिवती येथील प्रसिद्ध माणिकगड किल्ल्यावर प्राचीन भुयारी मार्ग शोधण्यात जिवतीच्या वनविभागाला यश मिळाले. या प्राचीन रस्त्याकडे पुरातत्व विभागाने विशेष लक्ष देण्याची मागणीही वनविभागाच्या माध्यमातून केली गेली. मात्र पुरातत्व विभागाने या प्राचीन भुयारी मार्गाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने आजही हा भुयारी मार्ग बंद अवस्थेत आहे.जीवती तालुक्यातील निसर्गरम्य माणिकगड किल्ल्यावर ऐतिहासिक जीवनाची साक्ष देणाऱ्या अनेक वास्तु उभ्या आहेत. त्या ठिकाणी हेमाडपंथी विष्णूचे मंदिर असून मोठ्या प्रमाणात भाविक व पर्यटक येथे येत असतात. परंतु, या किल्ल्यावरील काही प्राचीन वास्तु संबंधीत विभागाकडून दुर्लक्ष केल्या जात असल्याने पर्यटकांची हिरमोड होत असल्याचे बोलले जात आहे. किल्ल्यावर चढताना लागणाऱ्या हरिण गेटच्या मागच्या बाजूला प्राचिन भुयारी रस्ता आहे. त्या भुयारी रस्त्याच्या गेटवर गणपतीची मूर्ती कोरलेले चित्र आजही स्पष्टपणे दिसते. गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या प्राचीन भुयारी मार्गाचा शोध घेण्यात जीवती वनविभागाला यश आले. परंतु पुरातत्व विभागाला कळवूनही या भुयारी मार्गाला मोकळा करण्याच्या कुठल्याही हालचाली केल्या नाहीत. त्यामुळे आजही हा भुयारी मार्ग बंदच असून याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

पुरातत्व विभागाने काम बंद केलेकिल्ल्यावरील ऐतिहासिक वास्तुच्या देखभाल दुरुस्तीचे काम पुरातत्व विभागाकडून गेल्या तीन वर्षांपासून सुरु होते. यात किल्ल्यावरील संरक्षण भिंत, घोडपांग सारखी इत्यादी कामे झाली आहेत. परंतु, संरक्षण भिंतीवरुन पर्यटकांच्या रहदारी व परिसराचा आनंद घेण्यासाठी सुरू असलेले पायव्याचे काम पुरातत्व विभागाने बंद करण्यात आले आहे. याबाबत कंत्राटदार काकडे यांना विचारणा केली असता, पुरातत्व विभागानेच काम बंद केल्याचे ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Fortगड