जिद्द व चिकाटीने कार्य केले तर मिळते फळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:39 IST2021-02-05T07:39:12+5:302021-02-05T07:39:12+5:30

अध्यक्षस्थानी निवृत्त पोलीस अधिकारी धनराज वंजारी तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दळवी स्मारक रुग्णालयाचे संचालक नानासाहेब आखरे उपस्थित होते. ...

If you work with perseverance and perseverance, you will get fruit | जिद्द व चिकाटीने कार्य केले तर मिळते फळ

जिद्द व चिकाटीने कार्य केले तर मिळते फळ

अध्यक्षस्थानी निवृत्त पोलीस अधिकारी धनराज वंजारी तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दळवी स्मारक रुग्णालयाचे संचालक नानासाहेब आखरे उपस्थित होते. ॲड. काकडे म्हणाले, अगदी बालपणापासून लेखनाची सवय जडली. वडील बंधू विजय काकडे यांनी मार्गदर्शन केले. आपला वकिली व्यवसाय सांभाळताना छंदाकडे दुर्लक्ष केले नाही. एकदा वकील मित्राने व्यवसायाकडे दुर्लक्ष होत असल्याचे म्हटले होते. त्यांना एकदाची वकिली सोडीन पण छंद सोडणार नाही, असे त्यांना उत्तर दिले होते. असे सांगताच सभागृहात एकच हशा पिकला. यावेळी मराठी नाट्य आणि चित्रपट कलावंत श्रेयश जाधव, गडचिरोलीच्या उद्योजिका प्राजक्ता आदमने-कारू यांना विदर्भरत्न तर वन्यजीवप्रेमी हिमांशू बागडे यांना नागपूररत्न, आशिया तसेच इंडिया बुकमध्ये नाव नोंदविणारी जुई अग्रवाल या विद्यार्थिनीला प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आला. सन्मानपत्राचे वाचन प्रा. कोमल ठाकरे व प्राचार्य किरण उराडे यांनी केले. संचालन रश्मी पदवाड-मदनकर, ॲड. पुरुषोत्तम घाटोळे, प्रास्ताविक स्वप्निल समर्थ यांनी केले. अनिल मालोकर यांनी आभार मानले.

Web Title: If you work with perseverance and perseverance, you will get fruit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.