शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

ताप न आल्यास विश्वास बसेना; लस खरी की खोटी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 05:00 IST

आरोग्य तज्ज्ञांच्या मतानुसार, कोरोना प्रतिबंधाची लस घेतल्यानंतर रोगप्रतिकारकशक्ती या स्पाइक प्रोटीनवर हल्ला करते. ज्यामुळे काही जणांना जळजळ व आजारासोबतच वेदना सुरू होतात. शरीरात अतिसामान्य दुष्परिणाम दिसतात. मात्र, एक-दोन दिवसांत आपोआप दूर होतात. लसीतून मिळणारे स्पाइक प्रोटीन वेगवान व प्रभावी असते.  त्यासाठी घाबरण्याचे कारण नाही. लसीमुळे शरीरात होणाऱ्या दुष्परिणामांचा अर्थ असा आहे, की आपली रोगप्रतिकारकशक्ती सामान्य आहे.

राजेश मडावीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर :  कोरोना लस घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली. मात्र, लस घेतल्यानंतर ताप आला नाही तर लस खरी की खोटी, हा संभ्रम नागरिकांत कायम आहे. त्यामुळे आरोग्य विभागानेही जागृतीवर भर देणे सुरू केले. याचा सकारात्मक परिणाम होत असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.  आरोग्य तज्ज्ञांच्या मतानुसार, कोरोना प्रतिबंधाची लस घेतल्यानंतर रोगप्रतिकारकशक्ती या स्पाइक प्रोटीनवर हल्ला करते. ज्यामुळे काही जणांना जळजळ व आजारासोबतच वेदना सुरू होतात. शरीरात अतिसामान्य दुष्परिणाम दिसतात. मात्र, एक-दोन दिवसांत आपोआप दूर होतात. लसीतून मिळणारे स्पाइक प्रोटीन वेगवान व प्रभावी असते.  त्यासाठी घाबरण्याचे कारण नाही. लसीमुळे शरीरात होणाऱ्या दुष्परिणामांचा अर्थ असा आहे, की आपली रोगप्रतिकारकशक्ती सामान्य आहे. आपल्या पेशी व्हायरसपासून संरक्षणासाठी ॲटिबॉडीज तयार करीत आहेत. ज्यांना लस घेतल्यानंतर दोन्ही गुडघ्यांमध्ये वेदना होत असतील ते स्पाइक प्रोटीनमुळे होतात. काहींना तापही येतो. यावरून लस खरी की खोटी हे समजने अथवा गैरसमज करून घेणे चुकीचे असल्याचा दावा आरोग्य प्रशासनाने केला आहे. लसीकरणानंतर होणाऱ्या वेदना व कोरोना झालेला असताना होणाऱ्या वेदना याबाबतचा फरक आरोग्य विभाग समजावून सांगत आहे. वेदना सारखीच असते. मात्र, नैसर्गिक कोरोना संसर्गातून बरे झाल्यानंतरच्या लोकांना ज्या वेदना होतात. या वेदना काही दिवसांतच बऱ्या होतात. म्हणून या वेदनांबद्दल काळजी करण्याची गरज नाही. दोन्ही वेदना काही दिवसांतच दूर होतील. यावरून लसीची गुणवत्ता खरी की खोटी, हे तपासण्याचे कारण नाही. नागरिकांनी आरोग्य पथकाच्या जनजागृतीवर विश्वास ठेवावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

दोनही लसींची गुणवत्ता सारखीचचंद्रपूर जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरू झाल्यानंतर सर्वात आधी कोविशिल्ड लसीचा पुरवठा झाला होता. नागरिकांमध्ये या लसीबाबत गैरसमज नव्हते. कोव्हॅक्सिन लसीचा पुरवठा विलंबाने झाला. काहींना या लसीविषयी अफवा पसरविल्या होत्या. आरोग्य विभागाच्या लक्षात येताच यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली. त्याचा चांगला परिणाम झाला. दोन्ही लसींची गुणवत्ता सारखीच असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. 

कोविडविरोधी लस घ्यायलाच हवीमधुमेह, उच्च रक्तदाब किंवा हृदयाचे आजार असे कोमॉर्बिड म्हणजे इतर दीर्घकालीन आजार असतील तर लस घ्यायलाच हवी. या लोकांना  संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे. केंद्र सरकारने सुरुवातीला प्राधान्याने या लोकांना लस द्यायला सुरुवात केली. लस घेण्यासाठी आपल्या या आजारांसाठी सुरू असलेल्या औषधांच्या वेळापत्रकातही बदल करू नये. त्यांनी ठरलेल्या वेळेत औषधी घ्यावी, अशा सूचना तज्ज्ञांनी दिल्या आहेत.

 लस घेतल्यानंतर काहीच झाले नाही... 

 माझ्या संपर्कातील काही जणांना ताप, शरीर दुखणे, अशक्तपणा अशा समस्या निर्माण झाल्या. मलाही थोडी कणकण झाले. मात्र, दुसऱ्या दिवशी ही समस्या आपोआप दूर झाली. डॉक्टरला दाखविले असता लसीकरणानंतर जाणवणारे हे सौम्य परिणाम असल्याचे सांगितले. - विवेक बुरडकर, समाधी वाॅर्ड, चंद्रपूर

लस घेण्यापूर्वी मला काही ओळखीच्या लाेकांनी दुष्परिणामाबाबत माहिती दिली. लस घेतल्यानंतर असे काहीच जाणवले नाही. थोडी तापाची लक्षणे जाणवली. मात्र, अजूनही कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसीबाबत समाजमनात अफवा आहेत.   -राजेंंद्र तिवस्कर, अंचलेश्वर वॉर्ड, चंद्रपूर

उपाशीपोटी लस घेऊ नकालस घ्यायला जाताना रिकामी पोटी जाऊ नका. लस घेतल्यानंतर अशक्तपणा किंवा क्वचित चक्कर आल्यासारखेही वाटेल. त्यामुळे थोडे तरी खाऊन जावे. लस घेतल्यानंतर तो भाग किंचित दुखू शकतो. सूज येऊ शकते. पण काही दिवसांतच आपोआप कमी होतो, अशी माहिती जि. प. आरोग्य विभागाने दिली

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या