वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास आंदोलन
By Admin | Updated: December 22, 2016 01:59 IST2016-12-22T01:59:58+5:302016-12-22T01:59:58+5:30
प्रतीक्षा यादीत असलेल्या अनेक आदिवासी विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश मिळालेला नाही.

वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास आंदोलन
विद्यार्थी संघटनेचा इशारा : प्रकल्प अधिकाऱ्यास निवेदन
चिमूर : प्रतीक्षा यादीत असलेल्या अनेक आदिवासी विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश मिळालेला नाही. तसेच २०१५-१६ या वर्षातील शिष्यवृत्तीही विद्यार्थ्यांना मिळालेली नाही. या विरोधात सन विद्यार्थी संघटनेने एल्गार पुकारला असून या दोन्ही समस्या त्वरित मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा प्रकल्प अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते. वसतिगृहामध्ये प्राविण्य गुणाच्या आधारावर प्रवेश दिल्या जातो. त्याची यादी लावली जाते.
या यादीत अनेक विद्यार्थ्यांचे नाव नाही. चिमूर तालुक्यात आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्यामुळे त्यांच्या राहण्याच्या सुविधेचा मोठा प्रश्न ऐरणीवर आला. यामुळे दुर्गम ठिकाणातील शिक्षणाकरिता धडपड करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांची परवड होत आहे.
या विद्यार्थ्यांना खास बाब म्हणून प्रवेश देण्याची मागणी आहे. तसेच मागास वर्गातील विद्यार्थ्यांना शासनाकडून शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र, मागील वर्षीची शिष्यवृत्ती अद्याप विद्यार्थ्यांना मिळालेली नाही. प्रशासनाच्या उदासीन धोरण याला कारणीभूत आहे. (तालुका प्रतिनिधी)