सभापती चोखारे तर उपसभापतिपदी डवरे

By Admin | Updated: May 11, 2016 01:23 IST2016-05-11T01:23:27+5:302016-05-11T01:23:27+5:30

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडीसाठी बाजार समितीच्या सभागृहात

If the chairperson is elected, then the Deputy Speaker | सभापती चोखारे तर उपसभापतिपदी डवरे

सभापती चोखारे तर उपसभापतिपदी डवरे

चंद्रपूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडीसाठी बाजार समितीच्या सभागृहात मंगळवारी दुपारी ३ वाजता निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांची दोन गटात विभागणी झाली. अंत्यत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत ईश्वर चिठ्ठीने सभापतीपदी दिनेश चोखारे यांची तर उपसभापती पदी त्याच गटाचे रणजित डवरे यांची निवड झाली.
सभापती पदासाठी काँग्रेसचे गंगाधर वैद्य व त्याच पक्षाचे दिनेश चोखारे यांच्यात लढत झाली. तर उपसभापती पदासाठी भाजपाचे सुनील फरकाडे व त्याच पक्षाचे रणजित डवरे यांच्यात लढत झाली. दोन्ही पदाच्या निवडणुकीत उमेदवारांना समान मते मिळाली. अखेर ईश्वरचिठ्ठीने निवड करण्यात आली.
चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ निवडण्याची प्रक्रिया एप्रिल महिन्यात पार पडली. या निवडणुकीत एकूण १८ जागांपैकी काँग्रेस प्रणित सहकार आघाडीने १३ जागांवर विजय मिळविला होता. ४ जागा भाजपाने तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला. मंगळवारी सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या गंगाधर वैद्य गटात सहा तर दिनेश चोखारे यांच्या गटात सात सदस्य विभागले गेले. हीच स्थिती भाजपाच्या उमेदवाराचीही झाली.
चार पैकी एक संचालक दिनेश चोखारे गटाला मिळाला. त्यानी एका अपक्ष उमेदवाराला आपल्याकडे ओढले. दिनेश चोखारे यांच्या गटात भाजपाचे सुनिल फरकाडे, संतोष चिल्लावार, अरविंद चवरे यांच्यासह गोविंदा पोडे, अल्का वाढई, विजय टोंगे, शोभा ठाकरे, शिला मेकलवार सामिल झाले. सभापती पदासाठी दिनेश चोखारे, गंगाधर वैद्य व योगेश बोबडे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. मात्र बोबडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने गंगाधर वैद्य व दिनेश चोखारे यांच्यात लढत होऊन ९-९ अशी समान मते मिळाली.

गोवरीच्या बालकाने काढली ईश्वरचिठ्ठी
४राजुरा तालुक्यातील गोवरी येथील शेतकरी प्रभाकर ईटनकर यांचा नऊ वर्षाचा मुलगा गोविंद हा वडिलासोबत येथील बाजार समितीत आला होता. आजच निवडणूक झाली आणि सभापती व उपसभापती पदासाठी उभे असणाऱ्या दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाली. यामुळे गोविंद प्रभाकर ईटनकर या बालकाच्या हाताने ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली.
काँग्रेसच्या अंतर्गत कलहाचा भाजपाला फायदा
४चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत १८ पैकी १३ जागावर काँग्रेसचे संचालक निवडून आले. यामुळे येथील बाजार समितीवर काँग्रेसचे वर्चस्व होते. भाजपाकडे केवळ चार सदस्य होते. त्यांनी पदाची आशा सोडली होती. मात्र सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत पदासाठी अंतर्गत विभागणी झाली. दोन्ही गटाकडे सदस्य संख्या ९-९ झाली. परिणामी दोन्ही गटाकडून उपसभापती पदाचे उमेदवार म्हणून भाजपाचे सुनील फरकाडे व रणजित डवरे यांनी नामांकन दाखल केले. काँग्रेसच्या अंतर्गत कलहाचा फायदा उचलून भाजपाने उपसभापती पदावर ताबा मिळविला.

Web Title: If the chairperson is elected, then the Deputy Speaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.