‘ईदी’ हिंदी राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात दुसरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2017 00:35 IST2017-02-28T00:35:49+5:302017-02-28T00:35:49+5:30
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ५६ व्या हिंदी अंतिम नाट्य स्पर्धेत चंद्रपूर येथील नवोदिता या संस्थेने सादर केलेल्या...

‘ईदी’ हिंदी राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात दुसरे
बकूळ धवने उत्कृष्ट अभिनेत्री : अजय धवने यांना दिग्दर्शनाचा द्वितीय पुरस्कार
चंद्रपूर : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ५६ व्या हिंदी अंतिम नाट्य स्पर्धेत चंद्रपूर येथील नवोदिता या संस्थेने सादर केलेल्या समीर पेणकर लिखित ‘ईदी’ हे नाटक उत्कृष्ट नाटय निर्मितीच्या द्वितीय पारितोषिकासह चार पारितोषिकांचे मानकरी ठरले आहे.
हिंदी अंतिम नाट्य स्पर्धेत ‘ईदी’ या नाटकाला निर्मितीचे द्वितीय पारितोषिक जाहीर झाले आहे. सवोत्कृष्ट दिग्दर्शनाचे द्वितीय पारितोषिक अजय धवने यांना जाहीर झाले आहे. उत्कृष्ट अभिनयासाठी गुण्वत्ता पुरस्कार बकुळ धवने हिला तर सर्वोत्कृष्ट प्रकाश योजनेचा प्रथम पुरस्कार मिथून मित्रा यांना जाहीर झाला आहे. सांगली जिल्हयातील मिरज येथे झालेल्या हिंदी अंतिम स्पर्धेत ३४ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. त्यातून ईदी चंद्रपूरची रंगपताका घेवून यशस्वी ठरले आहे.
या नाटकाचे निर्माते आशिष अंबाडे आहे. दिग्दर्शन अजय धवने यांचे असून नेपथ्य तेजराज चिकटवार, संगीत दुर्गेश वंजारी यांचे आहे. रंगभूषा व वेषभूषेची जबाबदारी मेघना शिंगरू आणि स्नेहीत पडगीलवार यांनी सांभाळली आहे. रंगमंच व्यवस्था पंकज नवघरे यांनी सांभाळली आहे. या नाटकात प्रशांत कक्कड, नूतन धवने, बबीत उईके, राजेंद्र तुपे, सचिन मोडकवार, हेमंत पाटील, धिरज भट, ओमप्रकाश गुंडावार, इरा धवने, सुरज रंगारी, कृष्?णा लुथडे, अक्षय नल्लूरवार, आदित्य गलांडे, सर्वेश जुमडे, आकाश वाढई, स्नेहीत पडगीलवार आदींनी भूमिका आहेत. नवोदिताचे ईदी हे नाटक मराठी राज्य नाटय स्पर्धेच्या अंतिम फेरीत तसेच कामगार राज्य नाटय स्पर्धेच्या अंतिम फेरीतही दाखल झाले आहे. या दोन्ही अंतिम फेरीमध्ये प्रयोगही सादर झाले आहेत. नवोदिताच्या ईदीच्या यशस्वी चमूचे अध्यक्ष शरद गुप्ता, माजी अध्यक्ष मुरलीमनोहर व्यास, प्रकाश दोड, सचिव प्रशांत कक्कड यांच्यासह सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत केले आहे. (प्रतिनिधी)