शिक्षकांमुळेच आदर्श विद्यार्थी घडतात: मुरंबीकर
By Admin | Updated: March 31, 2016 01:25 IST2016-03-31T01:25:41+5:302016-03-31T01:25:41+5:30
शिक्षकांमुळेच संस्कारिक आणि आदर्श विद्यार्थी घडत असतात. शाळेमध्येच बालकांच्या सुप्त गुणांचा व कौशल्याचा योग्य विकास होत असतो,

शिक्षकांमुळेच आदर्श विद्यार्थी घडतात: मुरंबीकर
चंद्रपूर: शिक्षकांमुळेच संस्कारिक आणि आदर्श विद्यार्थी घडत असतात. शाळेमध्येच बालकांच्या सुप्त गुणांचा व कौशल्याचा योग्य विकास होत असतो, असे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पी.एम. मुरंबीकर यांनी केले.
प्रियदर्शिनी सांस्कृतिक सभागृहात इरा किड्स प्लेस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. या संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, विद्यार्थी घडविणे शिक्षकांच्या हाती असल्यामुळेच शिक्षकांचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. तसेच मुलांनी आत्मविश्वासपूर्वक सादर केलेल्या नृत्य कलांचीही त्यांनी प्रशंसा केली.
तत्पूर्वी संमेलनाचे उद्घाटन विस्तार अधिकारी धनपाल फटींग यांच्या हस्ते झाले होते. प्रमुख पाहुणे म्हणून सतीश अवताडे, प्रवीण डोये, दीपक खामनकर, शैलजा तुराणकर, राकेश वैद्य, जान्हवी ठाकरे, योगेश ठाकरे, प्रशांत वैद्य उपस्थित होते.
याप्रसंगी छोट्या बालकांनी विविध प्रकारचे नृत्य, गाणी, कविता सादर केल्या. शेवटी पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन मृण्मयी अवताडे, वंशिका कन्नमवार तर आभार योगेश ठाकरे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)