लोकमान्य टिळक सेमी इंग्रजी प्राथमिक शाळेला आदर्श शाळा पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:25 IST2021-01-18T04:25:22+5:302021-01-18T04:25:22+5:30
चंद्रपूर : सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनातर्फे मुंबई येथे शिक्षण दिनाचे औचित्य साधून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते राज्यस्तरीय ...

लोकमान्य टिळक सेमी इंग्रजी प्राथमिक शाळेला आदर्श शाळा पुरस्कार
चंद्रपूर : सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनातर्फे मुंबई येथे शिक्षण दिनाचे औचित्य साधून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते राज्यस्तरीय शिक्षण परिषद व पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला. सोहळ्यात लोकमान्य टिळक सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा, मनपा, समाधी वार्ड या शाळेला आदर्श शाळा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सदर पुरस्कार शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापिका सुरेखा निंबाळकर यांनी शाळेच्या प्रगतीकरिता विविध नावीन्यपूर्ण उपक्रम घेऊन मुलांचे पटसंख्येत वाढ, गुणवत्ता विकास कार्यक्रम, मोफतपूर्व प्राथमिक शिक्षण व इतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन शाळेला पुरस्कृत केले. यामध्ये त्यांच्यासोबत शाळेच्या सहायक शिक्षिका नीलिमा हिंगे, प्रवीण कावटे, केंद्र समन्वयक सुनील आत्राम, प्रशासकीय अधिकारी नागेश नित यांनी शाळा विकासात सहभाग दर्शविला.