महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा आदर्श जपा - गुरुनुले
By Admin | Updated: February 3, 2016 01:02 IST2016-02-03T01:02:53+5:302016-02-03T01:02:53+5:30
महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे द्यावेत व विद्यार्थी घडवावा, ...

महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा आदर्श जपा - गुरुनुले
उपरी : महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे द्यावेत व विद्यार्थी घडवावा, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरूनुले यांनी केले.
सावली पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या व्याहाड (बुज) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शुक्रवारी पार पडलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या
राज्यात अलीकडे, शासनाने शिक्षणात सुधारणा करण्यासाठी मिशन नवचेतना कार्यक्रम सुरू केला आहे. तो कार्यक्रम प्रत्येक शाळेत राबवून विद्यार्थ्यांना खेळीमेळीच्या वातावरणात शिक्षण द्यावे.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीस मदत होईल, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने संध्याताई गुरुनुले यांनी व्याहाड (बुज) जि.प. शाळेला एक संगणक देण्याचे आश्वासन दिले. मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे कौतुक करून दोन हजार रुपयांचे बक्षीसही त्यांनी दिले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य वैशाली कुकडे होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून पं.स. सभापती चंदा लेनगुरे, पं.स. सदस्य राकेश गड्डमवार, अविनाश पाल, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर लेनगुरे, विस्तार अधिकारी वैभव खांडरे, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष चंद्रकला करकाडे, अनिल गुरनुले, डॉ.तोडेवार, ग्रा.पं. सदस्य वंदना गुरनुले, रेखा भोयर, तु.बा. कुनघाडकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी प्रबोधनात्मक कला, नृत्य, एकांकीका, जनजागृती कलापथक सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. संचालन निकीता पारपेलीवार यांनी केले तर आभार राजु कोलते यांनी मानले. (वार्ताहर)