शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

हुश्श..बाधितांचा आलेख घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2020 5:00 AM

शनिवारी पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील ७८ बाधित, बल्लारपूर तालुक्यातील चार, मूल तालुक्यातील नऊ, जिवती तालुक्यातील एक, कोरपना तालुक्यातील एक, ब्रह्मपुरी तालुक्यातील चार, नागभीड तालुक्यातील दोन, वरोरा तालुक्यातील चार, भद्रावती तालुक्यातील एक, सावली तालुक्यातील तीन, सिंदेवाही तालुक्यातील सात असे एकूण ११४ जणांचा समावेश आहे.

ठळक मुद्देकोरोना काळातला मोठा दिलासा । केवळ ११४ ची भर, तर ४०१ कोरोनातून मुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना काळातला आजचा दिवस जिल्ह्यासाठी आनंद व दिलासा देणारा ठरला आहे. मागील दोन महिन्यांपासून अतिशय जलदगतीने वाढणारा कोरोनाबाधितांचा आलेख शनिवारी अचानक घसरला. मागील दोन महिन्यानंतर प्रथमच जिल्ह्यात शनिवारी नव्या केवळ ११४ बाधितांची भर पडली आहे. तर तब्बल ४०१ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.शनिवारी जिल्ह्यात नवे ११४ बाधित पुढे आले आहेत. जिल्ह्यात बाधितांची एकूण संख्या आता दहा हजार ८६७ झाली आहे. तीन हजार ५७४ बाधितांवर सध्या जिल्ह्यात उपचार सुरु आहेत.सात हजार १३० बाधित जिल्ह्यात आतापर्यंत बरे झाले आहेत. नागरिकांनी बाहेर पडताना मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सिंग राखून दैनंदिन कामे करण्याची गरज असून असे केल्यानंतर कोरोनाबाधितांचा आलेख आणखी घसरण्यास मदत होणार आहे.शनिवारी पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील ७८ बाधित, बल्लारपूर तालुक्यातील चार, मूल तालुक्यातील नऊ, जिवती तालुक्यातील एक, कोरपना तालुक्यातील एक, ब्रह्मपुरी तालुक्यातील चार, नागभीड तालुक्यातील दोन, वरोरा तालुक्यातील चार, भद्रावती तालुक्यातील एक, सावली तालुक्यातील तीन, सिंदेवाही तालुक्यातील सात असे एकूण ११४ जणांचा समावेश आहे.ग्रामीण भागातील बाधितबल्लारपूर तालुक्यातील गौरक्षण वार्ड, दादाभाई नौरोजी वार्ड परिसरातून पॉझिटिव्ह आढळले आहे. मूल येथील वार्ड नंबर एक, वार्ड नंबर १६, वार्ड नंबर १७ तसेच तालुक्यातील सिंताळा, राजुली भागातून बाधित ठरले आहे. कोरपना तालुक्यातील गडचांदूर परिसरातून बाधित ठरले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील बाजार चौक, स्नेहनगर, गुजरी वार्ड भागातून बाधित पुढे आले आहे. नागभीड तालुक्यातील वाढोणा, सावरगांव परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. वरोरा तालुक्यातील अभ्यंकर वार्ड, मजरा भागातून बाधित ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील घोडपेठ परिसरातून बाधित पुढे आले आहे. सावली तालुक्यातील अंतरगाव, निमगाव भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. सिंदेवाही तालुक्यातील लोनवाही, मदनापूर वार्ड परिसरातून बाधित ठरले आहे.एका बाधिताचा मृत्यूजिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी एका बाधितेचा मृत्यू झाला आहे. भिवापूर वार्ड, चंद्रपूर येथील ७६ वर्षीय महिला बाधितेला १ ऑक्टोंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.या बाधितेला कोरोनासह न्यूमोनियाचा आजार असल्याने तिचा रुग्णालयातच उपचारादरम्यान शनिवारी मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत १६३ बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील १५४ जणांचा समावेश आहे.चंद्रपूर परिसरातील ७८ बाधितचंद्रपूर शहर व परिसरातून ७८ बाधित पुढे आले आहेत. यात जीएमसी परिसर, शिवाजीनगर, बाबुपेठ, मुक्ती कॉलनी परिसर, नगिनाबाग, सिस्टर कॉलनी, जटपुरा गेट परिसर, मेजर गेट परिसर, चोर खिडकी, अष्टभुजा चौक, सुमित्रा नगर, एकोरी वार्ड, ऊर्जानगर, विठ्ठल मंदिर वार्ड, बालाजी वार्ड, सिंधी कॉलनी परिसर, संजय नगर, घुटकाळा वार्ड, सिव्हील लाईन, समता नगर, समाधी वार्ड, स्नेह नगर, तुकूम, श्रीराम वार्ड, कोतवाली वार्ड, वृंदावन नगर, बंगाली कॅम्प, अरविंद नगर, इंदिरानगर, जयनगर वार्ड, विवेक नगर येथील बाधितांचा समावेश आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या