...अन् पार्थिव बघता बघता पतीनं अचानक पत्नीच्या चितेवर घेतली उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 04:39 IST2020-06-23T04:38:57+5:302020-06-23T04:39:11+5:30

उपस्थित लोकांनी त्याला चितेवरून बाहेर काढले. मात्र त्याने चितेलगतच असलेल्या विहिरीत उडी घेत आत्महत्या केली.

... The husband suddenly jumped on his wife's cheetah while looking at the earth | ...अन् पार्थिव बघता बघता पतीनं अचानक पत्नीच्या चितेवर घेतली उडी

...अन् पार्थिव बघता बघता पतीनं अचानक पत्नीच्या चितेवर घेतली उडी

राजेश माडूरवार 
वढोली (चंद्रपूर) : लॉकडाऊनच्या पाच दिवसांपूर्वी विवाह झालेल्या व तीन महिन्यांची गर्भवती असलेल्या विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार सुरू असताना पतीने जळत्या चितेवर उडी घेतली. उपस्थित लोकांनी त्याला चितेवरून बाहेर काढले. मात्र त्याने चितेलगतच असलेल्या विहिरीत उडी घेत आत्महत्या केली.
ही घटना सोमवारी गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथे घडली. भंगाराम तळोधी येथील रूचिता चिट्टावार हिचा विवाह १९ मार्च रोजी चंद्रपुरातील किशोर खाटिक यांच्याशी झाला होता. ती आपल्या पतीसह चंद्रपूरला राहत होती. चार दिवसांपूर्वी रूचिता येथे माहेरी आली. रविवारी सायंकाळी ती बाहेर पडली. पण वेळ घरी परतलीच नाही. त्यामुळे नातेवाईकांनी शोधाशोध केली. गावालगतच्या विहिरीमध्ये तिचा मृतदेह आढळून आला. रूचिता ही तीन महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती तिच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिली.

Web Title: ... The husband suddenly jumped on his wife's cheetah while looking at the earth