पतीचा पत्नीवर चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:29 IST2021-07-27T04:29:50+5:302021-07-27T04:29:50+5:30

चिमूर : नेरीहून जवळच असलेल्या काजळसर येथे पत्नी रोवणीच्या कामाला जात असताना पतीने सायकलवरून येऊन तिला वाटेत ...

Husband stabs wife | पतीचा पत्नीवर चाकूहल्ला

पतीचा पत्नीवर चाकूहल्ला

चिमूर : नेरीहून जवळच असलेल्या काजळसर येथे पत्नी रोवणीच्या कामाला जात असताना पतीने सायकलवरून येऊन तिला वाटेत मध्येच अडवून भांडण करून राग अनावर झाल्याने भाजी कापण्याच्या चाकूने पत्नीवर वार केला. यात चाकूचा वार उजव्या गालावर लागताच ती गंभीर जखमी झाली. हे पाहून आरोपीने घटनास्थळावरून पोबारा केला. ही घटना रविवारी सकाळी घडली.

काजळसर येथील महिला मथुरा महादेव सामुसाकडे (५५) ही रविवारी सकाळी १० वाजेदरम्यान रोवणीच्या कामाला जात असताना आरोपी पती महादेव सामुसाकडे (६२) हा सायकलवरून तिथे आला. वाटेत पत्नीला अडवून भांडू लागला. कडाक्याच्या भाडणानंतर पती महादेव याचा राग अनावर झाला आणि त्याने भाजीपाला कापण्याचा चाकू काढून सरळ पत्नीवर हल्ला केला. यात तिच्या उजव्या गालावर चाकूचा वार बसला. ती गंभीर जखमी झाली. तिच्या ओरडण्यामुळे पती महादेव याने घटनास्थळावरून पोबारा केला. घटनेची माहिती नेरी पोलिसांना देताच त्यांनी तत्काळ महादेव सामुसाकडे याला अटक केली.

Web Title: Husband stabs wife