पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला अटक, पत्नीची हत्याप्रकरण - दोन दिवसाच्या पोलीस कोठडीत रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:18 IST2021-07-23T04:18:12+5:302021-07-23T04:18:12+5:30
भिसी पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या जांभूळघाट प्राथमिक आरोग्य केंद्रामागील झुडपी जंगल परिसरात पत्नी शालू सिंदेवार व आरोपी पती बबलू सिंदेवार ...

पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला अटक, पत्नीची हत्याप्रकरण - दोन दिवसाच्या पोलीस कोठडीत रवानगी
भिसी पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या जांभूळघाट प्राथमिक आरोग्य केंद्रामागील झुडपी जंगल परिसरात पत्नी शालू सिंदेवार व आरोपी पती बबलू सिंदेवार दोघेही सरपण आणण्याठी मंगळवारी सकाळी गेले होते. पतीला तिच्या चारित्र्यावर संशय होता. यातूनच जंगलात त्यांच्यात भांडण झाले. पती बबलूचा राग अनावर झाला. तेथेच त्याने तोंडावर दोन मोठे दगड मारले. त्यामुळे ती बेशुद्ध झाली. पत्नी मरण पावली नाही म्हणून त्याने सरपण बांधण्यासाठी आणलेल्या दोरीला तिच्या गळ्यात टाकून दोर आवळून हत्या केली. त्यानंतर त्याने जंगम बेड्यावर येऊन मी माझ्या पत्नीला मारले, अशी कबुली दिली व फरार झाला. त्यानंतर तो काही वेळ मालेवाडा सुगत कुटी येथे होता. बुधवारी त्याने मालेवाडा येथे दारू प्यायल्याचे समजते. त्यानंतर तो जंगम बेड्यावर पोहचला. तेथील लोकांनी पोलिसांना माहिती दिली. भिसी पोलिसांनी तिथे पोहचून बबलूला अटक केली. न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.