चक्रीवादळाचा तडाखा

By Admin | Updated: April 30, 2016 00:49 IST2016-04-30T00:49:04+5:302016-04-30T00:49:04+5:30

गतवर्षीच्या कोरड्या दुष्काळाची झळ जिल्ह्यातील अनेक शेतकरी व नागरिक सध्या सोसत आहेत.

Hurricane strike | चक्रीवादळाचा तडाखा

चक्रीवादळाचा तडाखा

चंद्रपूर : गतवर्षीच्या कोरड्या दुष्काळाची झळ जिल्ह्यातील अनेक शेतकरी व नागरिक सध्या सोसत आहेत. मात्र निसर्गाची अवकृपा अद्यापही दूर झालेली नाही. नववर्षापासून चार महिन्यांत सतत अवकाळी पावसाचा फटका शेतकरी व नागरिक सहन करीत असताना गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात चक्रीवादळाचा कहर सुरू आहे. त्यामुळे वीज कंपनीसह अनेकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

बुधवारी रात्री जिल्ह्यात अनेक ठिकाणी चक्रीवादळासह पावसाने हजेरी लावली. तर गुरूवारीही चंद्रपूर शहरासह अनेक गावांना चक्रीवादळाचा तडाखा बसला. गुरूवारी रात्रीच्या सुमारास अनेक ठिकाणी चक्रीवादळासह पाऊस झाला. त्यामुळे अनेकांच्या घरांचे छप्परे उडाली. तर वीज कंपनीच्या खांबावर झाडे पडल्याने अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्या. त्यामुळे चंद्रपूर शहराचा वीज पुरवठा सुमारे एक तास खंडीत होता. तर अनेक गावातील वीज रात्रभर गूल होती.

गोवरी गावाला वादळाचा तडाखा
राजुरा तालुुक्यातील गोवरी येथे गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास अचानक आलेल्या चक्रीवादळाने गावातील बहुतांश घरांचे छप्पर उडाले. अनेक मोठमोठी झाडे उन्मळून पडली. विजेचे खांब तुटल्याने राजुरा-गोवरी मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. गोवरी येथील बंडू बोरकुटे, भास्कर गंधमवार, शंकर गंधमवार, भाऊराव जुनघरी यांचा घरांची छप्परे उडाली तर प्रभाकर जुनघरी, डॉ. वासुदेव लोहे, पैकन बल्की, नवनाथ पाचभाई, रुपेश पाचभाई यांच्या गोठ्यातील टिनाचे पत्रे वाऱ्याच्या जबरदस्त तडाख्यात उडून गेली. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की घराच्या छप्परांचा सांगाडाच ५०० फुटापर्यंत दूर फेकल्या गेला. यात अनेकांच्या घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. शंकर गंधमवार यांचा घरातील सर्व सदस्य सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास जेवण करण्याच्या तयारीत असतानाच अचानक आलेल्या वादळाने त्यांच्या घराचे संपूर्ण छप्पर उडवून नेले. काही कळायचा क्षणार्धात सर्व कुटुंब आभाळाखाली आले. जीवीत हाणी झाली नसली तरी मोठे नुकसान झाले आहे.

येन्सा येथे घरांचे नुकसान
येन्सा : येन्सा परिसराला बुधवारी सायंकाळच्या सुमारास चक्रीवादळाचा तडाखा बसला. वादळासह पाऊस झाल्याने येन्सा येथील सुधाकर तानबा निकुरे यांच्या घरावरील टिनपत्रे उडाले. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले. छत उडाल्याने त्यांना रात्री पावसातच दुसरीकडे आसरा घ्यावा लागला. सकाळी तहीलदार, तलाठी यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.

महिला जखमी
गोवरी येथील ६५ वर्षीय महिला बेबी मुंजमवार ही अंगणात बकरी बांधायला गेली होती. तेवढ्यात प्रचंड चक्रीवादळ आला. यात मुंजमवार यांचा घरावर ठेवलेला १५ किलोचा दगड बेबीताईच्या पायावर पडला. यात त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. सुदैवाने हा दगड तिच्या डोक्यावर पडला असता तर मोठा अनर्थ घडला असता.

धानपिकाचे नुकसान
पाथरी : यावर्षी आमदार विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नाने गोसेखुर्द धरणाचे पाणी आसोलामेंढा तलावात पाडून पााथरी येथील शेतकऱ्यांना उन्हाळी धान घेण्याची संधी मिळवून दिली. त्यामुळे परिसरातील अनेकांनी उन्हाळी धान पिकाची लागवड केली आहे. आजपर्यंत धान पीक जोमाने येवून भरपूर उत्पन्न होईल, अशी आशा होती. परंतु, बुधवार व गुरुवारी झालेला अवकाळी व वादळी पावसाने धानपीक जमीनदोस्त झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

वीज पडून म्हैस ठार
भेजगाव : मूल तालुक्यातील येसगाव येथे बुधवारी झालेल्या वादळी पावसात वीज कोसळून म्हैस ठार झाल्याची घटना घडली. परिसरात वादळी पाऊस झाला.

Web Title: Hurricane strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.