रानडुकरांची शिकार करुन मांस विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 06:00 IST2020-03-12T06:00:00+5:302020-03-12T06:00:36+5:30
तळोधी बा.वनपरिक्षेत्रातील आकापूर शिवारात धुलीवंदनाच्या दिवशी रात्री उश्राळमेंढा येथील तिघांनी कुत्र्याच्या मदतीने रानडुकरांची शिकार केली. त्याचे मांस वाढोणा गावात विकताना वनविभागाच्या पथकाने तिघांना अटक केली.

रानडुकरांची शिकार करुन मांस विक्री
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोधी बा.: तळोधी बा.वनपरिक्षेत्रातील आकापूर शिवारात धुलीवंदनाच्या दिवशी रात्री उश्राळमेंढा येथील तिघांनी कुत्र्याच्या मदतीने रानडुकरांची शिकार केली. त्याचे मांस वाढोणा गावात विकताना वनविभागाच्या पथकाने तिघांना अटक केली.
मास विक्री प्रकरणी तळोधी बा. वनपरिक्षेत्रातील उश्राळमेंढा येथील आरोपी केशव सोनु तुमराम (३५), गोपाळ तुळशिराम शेंदरे (५५), मनोज तुळसिदास तुमराम (२२) या तिघांनी कुत्र्याच्या मदतीने रानडुकराची शिकार करुन गावालगत असलेल्या शिवारात आणले. दरम्यान, वाढोणा गावात धुलीवंदनाच्या दिवशी मांस विकत असल्याची गुप्त माहिती वनविभागाला होताच तळोधी वनपरिक्षेत्र अधिकारी अभिलाषा सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक के.डी.गरमळे यांनी सापळा रचून तिन्ही आरोपींना मांसासह ताब्यात घेतले. यावेळी वनरक्षक एस.एस. कुळमेथे, आलेवाहीचे वनरक्षक पी.एम. गायकवाड, वनरक्षक एस.बी. पेंदाम, वनरक्षक एस.बी. चौधरी, बि.पी.येरमे तसेच वनमजूर उपस्थित होते. तिन्ही आरोपींविरुध्द वनकायदा संरक्षक अधिनियम १९७२ कलम २,९,३९,४८ ए.अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला