निवडणुकीसाठी उमेदवारांची शोधाशोध

By Admin | Updated: June 10, 2014 23:58 IST2014-06-10T23:58:03+5:302014-06-10T23:58:03+5:30

पोंभुर्णा तालुक्यातील जामतुकूम जामखुर्द ग्रामपंंचायतीची सार्वत्रिक निवडणूक येत्या २२ जून रोजी होत असल्याने गावात राजकीय कार्यकर्त्यांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण

Hunt for candidates for elections | निवडणुकीसाठी उमेदवारांची शोधाशोध

निवडणुकीसाठी उमेदवारांची शोधाशोध

देवाडा (खुर्द) : पोंभुर्णा तालुक्यातील जामतुकूम जामखुर्द ग्रामपंंचायतीची सार्वत्रिक निवडणूक येत्या २२ जून रोजी होत असल्याने गावात राजकीय कार्यकर्त्यांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे.
जामतुकूम व जामखुर्द या दोन्ही सात सदस्यीय ग्रामपंचायती असून महिलांच्या ५० टक्के आरक्षणामुळे राजकीय पक्षाची झोप उडाली आहे. महिलांच्या आरक्षणामुळे पुरुषांना आपली उमेदवारी सोडावी लागत असल्याचे शल्य मनात असले तरी कायद्याच्या चौकटीत बांधलेला पुरुष मात्र पक्षाच्या हितासाठी अधिक परिश्रम घेण्याच्या तयारीत दिसून येत आहे.
२२ जून रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या गटाचा उमेदवार शोधणे सुरू केले असून त्यांच्या जात प्रमाणपत्राच्या पुर्ततेसाठी कागदपत्र जमा करण्यात मग्न झाले आहेत.
जामतुकूम येथे सर्वसाधारण महिला सरपंचपदाचे सेक्टर असून जामखुर्द येथे सरपंचपद सामान्य महिलेसाठी राखी आहे. ५० टक्के महिलांना उमेदवारी द्यावयाची आहे. मात्र असे असले तरी गावातील अनेक महिलांकडे जातप्रमाणपत्र, शौचालय सुविधा, गृहकाराची पावती नसल्याने महिला उमेदवार शोधणे राजकीय कार्यकर्त्यांना मोठे कठिण चालले आहे. ज्या महिलांजवळ ही कागदपत्रे आहेत, त्यांनी निवडणुकीत उभे रहावे, यासाठी त्यांची मनधरणी केली जात आहे.
काही महिला राजकीय क्षेत्रात काम करण्यास इच्छुक दिसून येत नसल्याने उमेदवार शोधण्यास बरीच कसरत करावी लागणार आहेत. त्यामुळे महिला आरक्षणातील जागा कशा भरू काढाव्या, हा प्रश्न सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांपुढे आ वासून उभा आहे. एवढेच नाही तर बऱ्याच पक्षाचे कार्यकर्ते उमेदवारांचा संपूर्ण खर्च उचलण्यासाठी तयार झालेले आहे. त्यासाठी महिला उमेदवारांची शोधमोहिम झपाट्याने सुरू आहे.
विशेष म्हणजे यावर्षी महिलांसाठी सरपंचपद राखीव असल्याने सरपंचपदाच्या उमेदवारीकडे जास्त लक्ष घालून महिलांची मनधरणी करणे सुरू आहे. तालुक्यात जामतुकूम, जामखुर्द या गावची निवडणूक होत असल्याने दोन्ही गावात राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापू लागले आहे. कार्यकर्ते व पदाधिकारी निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. (वार्ताहर)''

Web Title: Hunt for candidates for elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.