शेकडो गुंतवणूकधारकांची जिल्हा कचेरीवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 00:44 IST2018-12-12T00:44:23+5:302018-12-12T00:44:49+5:30
समृध्दी जिवन मल्टी स्टेट पर्पज को आॅप. लि. कंपनीमध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या ४० ते ५० हजार भागधारकाांनी सुमारे ४५ कोटी रूपयांची रक्कम गुंतवली. मात्र, मॅच्युरीटी पूर्ण होऊनसुद्धा त्यांना मोबदला मिळाला नाही.

शेकडो गुंतवणूकधारकांची जिल्हा कचेरीवर धडक
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : समृध्दी जिवन मल्टी स्टेट पर्पज को आॅप. लि. कंपनीमध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या ४० ते ५० हजार भागधारकाांनी सुमारे ४५ कोटी रूपयांची रक्कम गुंतवली. मात्र, मॅच्युरीटी पूर्ण होऊनसुद्धा त्यांना मोबदला मिळाला नाही. त्यामुळे गुंतवणुकदारांनी मच्युरीटीची रक्कम परत द्यावी, या मागणीसाठी भारतीय युथ टाईगर्स संघटनेच्या नेतृत्वात जिल्हा कचेरीवर मोर्चा नेला. तसेच आपल्या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले.
भारत सरकारच्या कृषी मंत्रालयातंर्गत कंपनीला मान्यता असल्याने अनेकांनी आपल्या आयुष्यातील जमापुंजी कंपणीमध्ये गुंतवली. मात्र मुदत पूर्ण होऊन परतावा मिळाला नसल्याने आंदोलन केले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत झामरे, उपाध्यक्ष प्रशांत मेश्राम, नगरसेवक पप्पु देशमुख, प्रदीप उमरे, नितेश पाटील उपस्थित होते.