शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

शेकडो नागरिकांना मिळणार घरकुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 22:34 IST

महानगरपालिका क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेला गती देण्यासाठी मंजूर लाभार्थ्यांच्या मार्गदर्शन मिळावे, या हेतूने जोडदेऊळ सभागृहात महापौर अंजली घोटेकर यांच्या उपस्थितीत कार्यशाळा घेण्यात आली.

ठळक मुद्देमनपातर्फे कार्यशाळा : हजारो अर्जांची मनपा पथकाने केली पडताळणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महानगरपालिका क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेला गती देण्यासाठी मंजूर लाभार्थ्यांच्या मार्गदर्शन मिळावे, या हेतूने जोडदेऊळ सभागृहात महापौर अंजली घोटेकर यांच्या उपस्थितीत कार्यशाळा घेण्यात आली.सर्वांसाठी घरे २०२२ या संकल्पनेतून प्रत्येक कुटुंबाला पक्के घर असायला हवे. यासाठी केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेला गती देण्यासाठी मनपाकडून कागदपत्रांची पूर्तता करण्याचे काम सुरू आहे. यासाठी अर्जदारांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन पालिका कर्मचारी काम करत आहेत. वेळेचे नियोजन लक्षात घेऊन मनपाने योजनेअंतर्गत घरकूल बांधकामासाठी ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत. ज्यांची कागदपत्रे अपुरी आहेत अशा ४०७ अर्जधारकांना पहिल्या व आता दुसऱ्या टप्प्यात २८६ एकाच ठिकाणी बोलावून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केली. शासनातर्फे मंजूर योजनांचा लाभ गरजू नागरिकांना मिळावा, यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे. नागरिकांनी कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर घोटेकर यांनी केले. आयुक्त संजय काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. योजनेला गती देण्याच्या दृष्टीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेत हजारो लाभार्थ्यांची उपस्थिती होती.यावेळी सहाय्यक आयुक्त विजय देवळीकर, शहर अभियंता बारई, विजय बोरीकर, मोरे, राजीव पिंपळशेंडे, सारिका शिरभाते, सौरभ गौतम, राहुल भोयर, नरेंद्र पवार, अतुल भसारकर, प्रतीक देवतळे तसेच संबंधित वॉर्डातील नगरसेवक उपस्थित होतें. चंद्रपूर महानगरपालिका हद्दीमधे आजपर्यंत घटक ४ अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यास अनुदानअंतर्गत ४०७ व २८६ लाभार्थ्यांच्या अजाला केंद्र शासनाकडून मंजुरी प्राप्त झाली आहे. त्यापैकी दुसºया टप्प्यात २८६ लाभार्थ्यांसाठी प्रक्रिया लवकरच सुरु आहे.