शंभर वर्षे जुना पिंपळवृक्ष कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 00:25 IST2018-07-13T00:23:48+5:302018-07-13T00:25:11+5:30
जवळे प्लॉट, किल्लावॉर्ड भद्रावती येथील हनुमान मंदिर जवळील जवळपास शंभर वर्षापूर्वीचे जीर्णावस्थेत असलेले पिंपळाचे झाड गुरुवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास कोसळले. पहाटेची वेळ असल्याने कोणतीही जिवितहानी झाली नाही.

शंभर वर्षे जुना पिंपळवृक्ष कोसळला
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : जवळे प्लॉट, किल्लावॉर्ड भद्रावती येथील हनुमान मंदिर जवळील जवळपास शंभर वर्षापूर्वीचे जीर्णावस्थेत असलेले पिंपळाचे झाड गुरुवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास कोसळले. पहाटेची वेळ असल्याने कोणतीही जिवितहानी झाली नाही.
पिंपळाचे झाड कोसळल्याने विजेच्या तारा तुटल्या. विजेचा एक खांब कोसळला, तर एक खांब पूर्णत: वाकला. या ठिकाणी ११ केव्हीची लाईन आहे. नगर परिषदेतर्फे लावण्यात आलेल्या तीन खुर्च्यांवर सदर झाड कोसळले.
मुख्य म्हणजे, दिवसा या ठिकाणी वॉर्डातील नागरिक विश्रांतीच्या दृष्टीने बसलेले असतात. तसेच हा रस्ता सुद्धा रहदारीचा आहे. या झाडाच्या काही अंतरावरच हनुमान मंदिराजवळ तेवढेच जुने वडाचे झाड आहे. ते सुद्धा कोसळण्याच्या स्थितीत असल्याचे दिसून येते.
जीर्ण झालेले जुने झाड तोडण्यात यावे, अशा अनेक तक्रारी आपल्याकडे आल्या आहेत. नागरिकांच्या सुरक्षीततेच्या दृष्टीने जीर्ण झालेल्या झाडाच्या फांद्या व झाडाचे मुळ खराब झाले असल्यास मुळासकट ते झाड तोडणे गरजेचे आहे. झाड पुन्हा लावू शकतो. पण जिवितहानी झाल्यास मोठे नुकसान सहन करावे लागणार. त्यामुळे जीर्ण झाडे तोडण्यात येत आहेत.
- अनिल धानोरकर नगराध्यक्ष, भद्रावती .