शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

पोषण आहारात गरोदर महिला व बालकांची थट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2021 5:00 AM

लाभार्थ्यांना दिला गेलेला हा पोषण आहार अतिशय निकृष्ट दर्जाचा असून भेसळयुक्त असल्याचे पाहणीत दिसून आले. असा आहार आपल्या मुलांना कसा खाऊ घालू, असा सवाल वरोरा तालुक्यातील एकार्जूना येथील एका लाभार्थी महिलेने यावेळी केला. हा पोषण आहार आम्ही आहारात न वापरता जनावरांना खाऊ घालतो, असेही काही लाभार्थ्यांनी लोकमतला सांगितले. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महिला व बालविकास मंत्रालयामार्फत गरोदर माता, स्तनदा मातांसह सहा वर्षांखालील मुलांसाठी एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्पांतर्गत पोषण आहाराचा पुरवठा करण्यात येतो. लोकमतने चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, ब्रह्मपुरी, नागभीड, मूल, गोंडपिपरी, राजुरा, कोरपना व बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे याबाबतची वस्तुस्थिती जाणून घेतली असता धक्कादायक बाब पुढे आली. लाभार्थ्यांना दिला गेलेला हा पोषण आहार अतिशय निकृष्ट दर्जाचा असून भेसळयुक्त असल्याचे पाहणीत दिसून आले. असा आहार आपल्या मुलांना कसा खाऊ घालू, असा सवाल वरोरा तालुक्यातील एकार्जूना येथील एका लाभार्थी महिलेने यावेळी केला. हा पोषण आहार आम्ही आहारात न वापरता जनावरांना खाऊ घालतो, असेही काही लाभार्थ्यांनी लोकमतला सांगितले. १ ते ७ सप्टेंबर हा पोषण आहार सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या सप्ताहातच हा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात २,५६५ अंगणवाड्या तर मिनी अंगणवाडी ११९ अशा जिल्ह्यात २ हजार ८८४ अंगणवाड्या आहेत. लहान मुलांना पोषण आहार मिळावा, शाळेची ओढ लागावी म्हणून बालकांना अंगणवाडीच्या माध्यमातून या पोषण आहाराचा पुरवठा महाराष्ट्र कन्झुमर्स फेडरेशनतर्फे केला जातो. \दर दोन महिन्यांनी हा आहार दिला जातो. यात तांदूळ (१९०० ग्रॅम), गहू (१९०० ग्रॅम), मिरची पावडर (२०० ग्रॅम), हळद (२०० ग्रॅम), मूगडाळ (१००० ग्रॅम), मीठ (४०० ग्रॅम),  साखर (१०००ग्रॅम) दिले जाते. या वस्तूंबाबत काही लाभार्थ्यांनी केलेल्या तक्रारीची प्रत्यक्ष शहानिशा केली असता या तक्रारींमध्ये सत्यता आढळून आली. सर्वच अंगणवाडीतील हा प्रकार असल्याचे रिऑलिटी चेकमधून पुढे आले. 

लाभार्थी म्हणतात...पोषण आहारामध्ये चणा, मूगडाळ, गहू, हळद, मीठ, तांदूळ येत आहे. तिखट, चणा व मूगडाळ याचा दर्जा निकृष्ट आहे. या वस्तू  खाण्यायोग्य सुद्धा नाही. याचा परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावर हाेतो. तिखट तर फेकूनच देते. तेल मिळत होते. ते बंद झाले.- सुप्रिया सुळे, लाभार्थी.पोषण आहारामध्ये चणा, मूगडाळ, गहू, हळद, मीठ, तांदूळ येत आहे. तिखट, चणा व मूगडाळ याचा दर्जा निकृष्ट आहे. या वस्तू  खाण्यायोग्य सुद्धा नाही. याचा परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावर हाेतो. तिखट तर फेकूनच देते. तेल मिळत होते. ते बंद झाले.- सुप्रिया सुळे, लाभार्थी. 

गहू निकृष्ट, चणा पाकिटात किडे

बिबी गावातील एका लाभार्थ्याकडे असलेली पोषण आहाराची पाकिटे फोडून बघितली असता गहू अतिशय निकृष्ट तर चणा पाकिटात किडे आढळून आले. तिखट, हळद व मिठात भेसळ असल्याचे दिसून आले. इतर ठिकाणीही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही.  तिखटामध्ये बारीक माती दिसून आली

पोषण आहार वाटप केला जातो. त्याचा टेस्ट रिपोर्ट असतो. काही अंगणवाडीचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले जातात. पावसामुळे एखादठिकाणी होऊ शकते. ते आम्ही बदलून देतो. पोषण आहार निकृष्ट असल्याच्या तक्रारी आमच्यापर्यंत अद्याप आलेल्या नाही. तक्रारी असल्यास आम्ही तो बदलून देतो. - प्रकाश भांदककर, बालविकास अधिकारी (शहर), चंद्रपूर.

अंगणवाडी सेविकांवर दबाबपुरवठादाराकडून पोषण आहाराचा जो पुरवठा करण्यात येतो तो पाकिट बंद असतो. तो तसाच लाभार्थ्यांना वाटप करावा लागतो. पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याच्या तक्रारी काहीवेळा आल्या. याबाबत आम्ही वरिष्ठांना कळविले असता आमच्यावर दबाव आला.  - एक अंगणवाडी सेविका 

मूगडाळ ही अत्यंत निकृष्ट दर्जाची असून, खाण्यायोग्य नाही.  गव्हामध्येसुद्धा माती, खडे, सोंडे आहेत.- निकिता रोशन पायपरे, विसापूर

पोषण आहारामध्ये तेल देणे बंदच केले आहे आणि मिरचीला चव नसून, त्यामध्ये जाळ्या लागल्या आहे. फक्त पाकिटे दिसायला आकर्षक आहेत.- शीतल महेश नान्हे, विसापूर 

 

टॅग्स :government schemeसरकारी योजना