खाकी वर्दीतून पाझरली मानवता

By Admin | Updated: June 22, 2015 01:04 IST2015-06-22T01:04:42+5:302015-06-22T01:04:42+5:30

खाली वर्दीतल्या पोलीस दादाला पाहिले की, भल्या-भल्यांना घाम फुटतो. मात्र गुन्हेगारांना ‘बाजीराव’ चे फटके देत वठणीवर आणणाऱ्या....

Humanity wiped out from khaki uniform | खाकी वर्दीतून पाझरली मानवता

खाकी वर्दीतून पाझरली मानवता

भटकलेल्या महिलेला दिला आश्रय
ती म्हणाली, साहेब, आजच्या धडीला पोलिसच देव हायेत...!

राजकुमार चुनारकर खडसंगी
खाली वर्दीतल्या पोलीस दादाला पाहिले की, भल्या-भल्यांना घाम फुटतो. मात्र गुन्हेगारांना ‘बाजीराव’ चे फटके देत वठणीवर आणणाऱ्या पोलिसांची प्रतिमा याच वर्तुळात कार्यरत काही भ्रष्ट घटकांमुळे डागाळली गेली. पोलिसांना दया-माया नसते. त्यांच्यातलं माणूसपण संपलं, असेही शेरे लावले जातात. मात्र खाकी वर्दीतही एक संवेदनशिल माणूस दडलेला असतो, याची प्रचिती नुकतीच चिमूर शहरात आली.
पोलीस प्रशासनाबाबत सर्वसामान्यांमध्ये असलेल्या वाईट कल्पना चुकीच्या ठरवत चिमूर क्रांती नगरीत नव्यानेच रुजू झालेले ठाणेदार मनिष ठाकरे यांनी रात्रीच्या कर्तव्यावर असताना एका ६५ वर्षीय महिलेची आपबिती ऐकून घेऊन तिला पोलीस ठाण्यातच रात्रभर आश्रय दिला. मोठ्या आस्थेनं काय हवे, काय नको, अशी विचारणा करून दुसऱ्या दिवशी तिला तिच्या राहत्या गावी रवाना केले.
‘सदरक्षणाय खलनिग्रहनाय’ असे ब्रीद असलेले पोलीस समाज जेव्हा झोपतो, तेव्हा खाकी वर्दीतील पोलीस पहारा देत समाजाला सुरक्षा देतात. शुक्रवारी रात्री कर्तव्यावर निघालेले चिमूरचे ठाणेदार मनिष ठाकरे आपल्या ताफ्यासह वडाळा पैकू परिसरात गस्त करीत होते. दरम्यान, बसस्थानक परिसरात अचानक एक महिला पोलिसांच्या वाहनाला हात दाखवत आडवी झाली. तेव्हा आपले वाहन थांबवून ठाकरे यांनी तिला काय झाले, म्हणून विचारणा केली. ती घाबरलेल्या अवस्थेत होती. तिने आपबिती त्यांना आपबिती सांगितली.
नागपूर जिल्ह्यातील कुही येथील रहिवासी असलेल्या सदर वृद्धेचे नाव रमाबाई श्रीरंग मेश्राम आहे. ती चुकून चिमूर शहरात पोहोचली. तिच्या जवळ कुठलेही साधन नव्हते. तिची ती अवस्था पाहून खाकी वर्दीतील मानवता पाझरली. मनिष ठाकरे यांनी तिला आपल्या सोबत पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर या महिलेने दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर फोन केला. मात्र प्रतिसाद मिळला नाही. तेव्हा एका महिला शिपायाला बोलावून सदर वृद्धेला जेवण देण्यात आले. तिची झोपण्याचीही व्यवस्था करण्यात आली.
पोलिसांनी केलेली मदत पाहून भारावलेल्या त्या वृद्धेने आजच्या घडीला, पोलिसच देव आहेत, अशा भावना व्यक्त केल्या. रात्री बेरात्री फिरणाऱ्यांना दुरुनच पोलिसांची गाडी दिसली त्यांची भंबेरी उडते. मात्र एका अनोळखी महिलेला खाकी वर्दीतील अधिकाऱ्याने मानवता दाखवित केलेली मदत तिच्यासाठी लाख मोलाची ठरली.

Web Title: Humanity wiped out from khaki uniform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.