चिमुरात रक्तदान शिबिराला उदंड प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:20 IST2021-07-20T04:20:34+5:302021-07-20T04:20:34+5:30
चिमूर : सामाजिक दायित्व जोपासत माणुसकीचे नाते वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने लोकमत वृत्तपत्र समूह व भांगडिया फाउंडेशनतर्फे ‘लोकमत’चे संस्थापक ...

चिमुरात रक्तदान शिबिराला उदंड प्रतिसाद
चिमूर : सामाजिक दायित्व जोपासत माणुसकीचे नाते वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने लोकमत वृत्तपत्र समूह व भांगडिया फाउंडेशनतर्फे ‘लोकमत’चे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंती व आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यात अनेकांनी सहभागी होत रक्तदान करून सामाजिक बांधीलकी जोपासली.
लोकमत वृत्तपत्र समूह व भांगडिया फाउंडेशन, मित्र परिवार चिमूर यांच्या वतीने सोमवारी सकाळी १० वाजता भांगडिया वाडा, जुनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या इमारतीमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे, डॉ. श्याम हटवादे, समीर राचलवर, विवेक कापसे, अरुण लोहकरे, श्रेयश लाखे, अमित जुमडे, बंटी वणकर, सावन गाडगे, अरबाज खान, उत्कर्ष मोटगरे,
यांनी रक्तदान शिबिरात भाग घेऊन शिबिर यशस्वी केले. रक्तदान शिबिरादरम्यान आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
बॉक्स
रक्तदान करणारे रक्तदाते
स्वप्नील निनावे, राजू कामडी, भारती अमोल गोडे, गजानन वाडके, स्मित पटेल, प्रमोद राहुरके, स्वप्नील सावसाकडे, फिरोज पठाण, अमित जुमडे, अरबाज पठाण, उत्कर्ष मोटगरे, राजेंद्र बावनकार, विनोद चोखारे, श्रेहस हिंगे, नामेश्वर नन्नावरे, मोहमद शेख, राजू कसारे, अमरदास गायकवाड, तुषार तिवारी, श्रेहश लाखे, सोहेल कामडी, मंगेश मोहड, राहुल मडावी, श्रीसगार सुखारे, अंगद बांगडे, निखिल भोंगळे, रेहान शेख, प्रशांत तडस, ओमकार बावनकर, पराजित अगडे, आदित्य अगडे, शिवशंकर बंडे, सचिन तळवेकर.