शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

विद्यार्थ्यांना शिकवायचे कसे हेच खरे शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 06:00 IST

शिक्षक शाळेत विद्यार्थ्यांना दिवसभर शिकवत असतात. मात्र, वर्गातील ५० टक्के मुलांना न अडखळता वाचता येत नाही. स्पर्धेत टिकणारी पिढी घडवायची असेल तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकायचे कसे हे प्रथम शिकले पाहिजे, असे आवाहन राज्याच्या राजशिष्टाचार विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी केले. जिल्हा परिषदेने आयोजित मूलभूत क्षमता विकास कार्यक्रम अंतर्गत आंतरराष्ट्रीय शिक्षण विचार परिषदेच्या कार्यशाळेत मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

ठळक मुद्देनंदकुमार : मूलभूत सक्षम विकास कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शिक्षक शाळेत विद्यार्थ्यांना दिवसभर शिकवत असतात. मात्र, वर्गातील ५० टक्के मुलांना न अडखळता वाचता येत नाही. स्पर्धेत टिकणारी पिढी घडवायची असेल तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकायचे कसे हे प्रथम शिकले पाहिजे, असे आवाहन राज्याच्या राजशिष्टाचार विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी केले. जिल्हा परिषदेने आयोजित मूलभूत क्षमता विकास कार्यक्रम अंतर्गत आंतरराष्ट्रीय शिक्षण विचार परिषदेच्या कार्यशाळेत मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.यावेळी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, शिक्षणाधिकारी (प्राथ.) दीपेंद्र लोखंडे, शिक्षणाधिकारी (माध्य.) संजय डोर्लीकर, उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) मोहन पवार आदी उपस्थित होते.प्रधान सचिव नंदकुमार म्हणाले, सन २०२५ पर्यंत ४० टक्के नोकऱ्या संपणार आहेत. पुढील ३० वर्षांनंतर जग कसे राहिल हे शिक्षकांनाही माहित नाही. त्यामुळे ३० वर्षांनंतर निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना करण्याची क्षमता निर्माण होईल असे विद्यार्थी शिक्षकांनी घडविले पाहिजे. देशातील ५० टक्के मुले निरूपयोगी होऊ नये यासाठी अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय दर्जाचे हाच पर्याय असल्याचेही त्यांनी यावेळी नमुद केले. शिक्षण तज्ज्ञ निलेश घुगे यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण म्हणजे काय आणि अशा प्रकारचे शिक्षण देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रमुख १७ पैलुंबाबत मार्गदर्शन त्यांनी केले.आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पातळीवर शिक्षण देण्यासाठी प्रत्येक शिक्षकाने स्वत: पासून सुरूवात केल्यास गुणवत्तापूर्ण विद्यार्थी तयार होतील. शिक्षक, केंद्रप्रमुख शिक्षण विस्तार अधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी प्रधान सचिवांची संवाद साधला. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी (प्राथ.) दीपेंद्र लोखंडे तर संचालन प्रतिक्षा धोतरे यांनी केले. आयोजनासाठी लोकेश खंडारे, अर्चना मासिरकर, अरुण काकडे, फकीरा राठोड, प्रकाश भोयर, रणधीर पुद्दटवार, विजय ढोले, संदीप बुरेले, सूर्यकांत भडके आदींनी सहकार्य केले.

टॅग्स :Teacherशिक्षकStudentविद्यार्थी