तिसरी लाट कशी रोखणार? उपचार करणाऱ्यांचेच लसीकरण बाकी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:18 IST2021-07-22T04:18:22+5:302021-07-22T04:18:22+5:30
बॉक्स लसीकरणाबाबत उदासीनता का? कोरोनाला कोणताही उपचार नसल्याने लसीकरण हेच प्रभावी उपाय आहे. परंतु, लसीकरणाबाबत अनेकांच्या मनात भीती आहे. ...

तिसरी लाट कशी रोखणार? उपचार करणाऱ्यांचेच लसीकरण बाकी!
बॉक्स
लसीकरणाबाबत उदासीनता का?
कोरोनाला कोणताही उपचार नसल्याने लसीकरण हेच प्रभावी उपाय आहे. परंतु, लसीकरणाबाबत अनेकांच्या मनात भीती आहे. तसेच ग्रामीण भागात विविध प्रकारचे गैरसमज पसरले आहेत.
काही वैद्यकीय क्षेत्रातील लोकही लसीकरणाबाबत वेगवगळ्या चर्चा करीत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात लसीकरणासाठी पुढाकार घेत नसल्याचे दिसून येत आहे. लसीकरणानंतर काहीना त्रास होतो. त्यामुळे बहुतेकजण लस घेण्यास घाबरत आहेत.
बॉक्स
लसीकरणाला गती देणे गरजेचे
१८ ते ४४ वयोगटातील लसीकरण सुरू झाले आहे. मात्र, जिल्ह्यातील बहुतांश लसीकरण केंद्र आठवड्यातून अर्धे दिवस बंदच असतात. त्यामुळे अनेकांचे लसीकरण प्रलंबित आहे. ग्रामीण भागात मोजकेच डोस पाठविण्यात येतात. त्यामुळे अनेकांना गेल्या पावली परत यावे लागते.
एकूण लसीकरण
हेल्थ केअर वर्कर्स ३६,०३१
फ्रंट लाईन वर्कर्स ५२,३०२
पहिला डोस घेतलेले हेल्थ केअर वर्कर्स २०,१३४
फ्रंट लाईन वर्कर्स ३५,८६०
दुसरा डोस घेतलेले हेल्थ केअर वर्कर्स १५,८९७
दुसरा डोस घेतलेले फ्रंट लाईन वर्कर्स १६,४४२