शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
2
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
3
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
4
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
5
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
6
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
7
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
8
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
10
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
11
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
12
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
13
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
14
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
15
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
16
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
17
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
18
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
19
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
20
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 

जगायचे कसे ? घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा 25 रुपयांनी महागले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 05:00 IST

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाचे दर कमी असतानासुद्धा पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या किंमतीमध्ये प्रचंड वाढ करण्यात येत आहे. डिसेंबर २०२० मध्ये सिलिंडरचे दर ६५० रुपयांच्या जवळपास होते. मात्र त्यामध्ये सातत्याने वाढ करण्यात आली. आता या सिलिंडरचे दर ८७५ रुपये करण्यात आले. एकीकडे सिलिंडरच्या किमतीमध्ये वाढ होत असताना सबसीडीमध्ये कपात केली जात आहे. 

ठळक मुद्देसिलिंडरच्या सबसिडीमध्ये प्रचंड कपात : गृहिणींचे बजेट कोलमडले, डोळ्यात अश्रू

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लॉकडाऊनमुळे सर्वांची आर्थिक घडी विस्कटलेली असताना घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये २५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गॅस सिलिंडरसाठी आता ८७५ रुपये मोजावे लागणार आहे. डिसेंबर महिन्यात हे गॅस ६५० रुपयांना मिळत होते. सात महिन्यांच्या कालावधीत त्यामध्ये तब्बल २२५ रुपयांची भाववाढ करण्यात आली आहे. पूर्वीच कोरोनाने आर्थिक बजेट बिघडविले असताना सिलिंडरच्या दरवाढीने पुन्हा बजेट बिघडविले आहे. त्यामुळे महिलांना मोठी दमछाक होत आहे.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाचे दर कमी असतानासुद्धा पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या किंमतीमध्ये प्रचंड वाढ करण्यात येत आहे. डिसेंबर २०२० मध्ये सिलिंडरचे दर ६५० रुपयांच्या जवळपास होते. मात्र त्यामध्ये सातत्याने वाढ करण्यात आली. आता या सिलिंडरचे दर ८७५ रुपये करण्यात आले. एकीकडे सिलिंडरच्या किमतीमध्ये वाढ होत असताना सबसीडीमध्ये कपात केली जात आहे. ग्राहकांना केवळ ३० ते ४० रुपये सबसिडी देण्यात येत आहे. मागील वर्षीपासून कोरोनामुळे लॉकडाऊन असताना सर्वजण आर्थिक संकटात आहेत. त्यातच घरगुती गॅसच्या दरामध्ये वाढ करण्यात येत असल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

सात महिन्यात २२५ रुपयांची वाढडिसेंबर महिन्यात गॅस सिलिंडरचे दर ६५० रुपयांच्या जवळपास होते. मागील सात महिन्यांच्या कालावधीत त्यामध्ये तब्बल २२५ रुपयांची भाववाढ करण्यात आली आहे. आता सिलिंडरचे दर ८७५ रुपयांच्या जवळपास पोहोचले आहे. सततच्या दरवाढीने गृहिणींच्या किचनचे बजेट कोलमडले आहे.

पुन्हा पेटल्या चुलीकोरोनामुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. काम मिळणे बंद झाले आहे. तर अनेकजण बरोजगार झाले आहेत. यातच घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला आता सर्रास चुलीकडे वळताना दिसून येत आहेत. याऊलट गॅसवर मिळणाऱ्या सबसिडीमध्ये मोठ्या प्रमाणात कपात करण्यात येत आहे. त्यामुळे सिलिंडरसाठी रक्कम आणायची कोठून असा प्रश्न ग्रामीण महिलांना पडत आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या सावटात अनेक महिला जंगलामध्ये सरपण गोळा करायला जात आहेत. धूरमूक्त गाव करण्याच्या उद्देशाने ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी उज्ज्वला गॅस योजना सुरु करण्यात आली होती. या लाभार्थ्यांना पूर्वी बऱ्यापैकी सबसिडी देण्यात येत होती. मात्र आता त्यामध्ये कपात करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पून्हा चूल पेटत असल्याचे दिसून येत आहे.

घर खर्च भागवायचा कसा

कोरोनामुळे आर्थिक अडचण आहे. कामसुद्धा बंदी आहे. त्यामुळे दोन वेळेची भ्रांत कशी काढावी, असा प्रश्न आहेत. त्यातच शासनाकडून सिलिंडरच्या किंमतीमध्ये प्रचंड वाढ करण्यात येत आहे. त्यामुळे कुटुंब कसे चालवायचे असा प्रश्न आहे.- रंजू गोवरदीपे, गृहिणी

खाद्य तेल, दाळ आदी जीवनावश्यक किंमतीच्या दरात वाढ करण्यात आली होती. आता गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे किचनचा बजेट बसवताना मोठी कसरत करावी लागत आहे.प्रतिमा कोडापे, गृहिणी

 

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर