खरीपाचा भार उचलणार तरी कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 05:00 AM2020-05-15T05:00:00+5:302020-05-15T05:01:12+5:30

शेतकऱ्यांना कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळाचे संकट नित्याचेच आहे. या संकटातून सावरताना अवकाळी पावसाचा तडाखाही सहन करावा लागत आहे. आता तर कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे खरीप तसेच रब्बी हंगामातील पीक कसे विकावे, हा प्रश्न त्यांना पडला आहे. सर्व संकट विसरून शेतकरी पेरणीपूर्व हंगामाची कामे करीत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात बघायला मिळत आहे.

How to carry the burden of kharif? | खरीपाचा भार उचलणार तरी कसा?

खरीपाचा भार उचलणार तरी कसा?

Next
ठळक मुद्देशेतमालाची विक्री झालीच नाही : शेतकऱ्यांना पीक कर्ज भरणेही झाले कठीण

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: कोरोनामुळे नागरिक विविध संकटाचा सामना करीत आहेत. त्यातच शेतकरी तर सातत्याच्या विविध संकटांच्या मालिकेने त्रस्त झाला आहे. त्यामुळे पेरणीपूर्व मशागत करुनही आर्थिक टंचाईमुळे खरीप हंगामाची पेरणी कशी करायची, असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांना पडला आहे.
शेतकऱ्यांना कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळाचे संकट नित्याचेच आहे. या संकटातून सावरताना अवकाळी पावसाचा तडाखाही सहन करावा लागत आहे. आता तर कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे खरीप तसेच रब्बी हंगामातील पीक कसे विकावे, हा प्रश्न त्यांना पडला आहे. सर्व संकट विसरून शेतकरी पेरणीपूर्व हंगामाची कामे करीत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात बघायला मिळत आहे. परंतु त्याचवेळी त्यांना आर्थिक चिंताही सतावत आहे. खरीप पेरणीसाठी लागणारा खर्च कसा उभारायचा या चिंतेत सध्या जिल्ह्यातील शेतकरी आहे. जिल्ह्यात पाहिजे तशा सिंचनाच्या सुविधा नसल्यामुळे शेतकरी निसर्गाच्या पावसावर अवलंबून आहे.
कधी अल्प पाऊस, अतिवृष्टी, गारपीट आदींचा सामना करताना शेतकरी मेटाकुटीला आला आहे. लॉकडाऊनमुळे पिकांची विक्री करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या. त्यात पुन्हा अवकाळी, गारपीटचा मारा सहन करावा लागल आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. आता खरिपाची पेरणी कशी करायची, असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडला आहे.

कृषी संचालकांची उधारी वसूल झालीच नाही
जिल्ह्यातील अनेक कृषी केंद्रसंचालकांची मागील वर्र्षाची उधारी आली नसल्याने कृषी केंद्र संचालक बी-बियाणे, खते व औषधी कंपनीला वेळेवर पैसे देऊ शकले नाही. त्यामुळे मिळणारी सवलतही त्यांना गमवावी लागली. परिणामी कृषी केंद्र संचालकांचा यावर्षीचा व्यवसायही अडचणीत सापडला आहे. कृषी केंद्रांकडून खते, बियाणे व औषधीची कंपनीकडे नोंदणी केली जात आहे. मात्र मोजकाच माल नोंदविला जात आहे. विशेष म्हणजे, काही जण चोर बिटी विक्रीचा प्रयत्न करीत आहे. चार ते पाच दिवसापूर्वी मूल-खेडी मार्गावर कृषी विभागाने एक ट्रक जप्त करून मोठा बीटी साठा जप्त केला. असा साठा विक्री झाल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आर्थिक फटका
लॉकडाऊनचा हा काळ शेतकऱ्यांसाठी आर्थिक संकटात लोटणारा आहे. अस्मानी संकटाने शेतकरी वैतागला आहे. कोरडा व ओला दुष्काळ, गारपीट अशा संकटाना शेतकरी सामोरे जात आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे शेतमाल विक्रीचा प्रश्न कठीण झाला आहे. त्यामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे.


तालुक्यातील शेतकºयांना प्राधान्य
सोयाबीन बियाने विकताना प्रथम तालुक्यातील शेतकºयांना प्राधान्य द्या, जे बियाने शिल्लक राहत असेल तर इतर तालुक्यातील शेतकºयांना द्यावे अशा सूचना वरोरा कृषी विभागाने कृषी केंद्र संचालकांना दिल्या आहेत.

कृषीकेंद्र संचालक अडचणीत
कोरोनामुळे अनेक व्यवसाय व उद्योगांवर परिणाम झाला आहे. असाच परिणाम कृषी केंद्रावरही पडला आहे. पावसाळा अगदी महिन्यावर आला असतानाही जिल्ह्यातील काही भागात कपाशी बियाणे अद्यापही पोहोचले नाही. तसेच गेल्यावर्षीची उधारीही बाकी असल्याने ती वसूल होणार की, नाही, याची चिंता संचालकांना सतावत आहे. शेतकरी हा शासनाचे धोरण व नैसर्गिक आपत्तीमुळे नेहमीच आर्थिक संकटात सापडत आहे. परंतु यावर्षी देशात घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शेतकºयांचे चांगलेच कंबरडे मोडले आहे. पिकवलेल्या माल संचारबंदीमुळे, मजुरांअभावी शेतातच खराब होत आहे.

बी-बियाणांचा प्रश्न
यावर्षी शेतकºयांकडे पैसा शिल्लक नसल्याने येणाऱ्या खरीप हंगामाची व्यवस्था कशी करावी, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कृषी केंद्र चालकांची मागील वर्र्षाची उधारी अद्यापही काही शेतकरी देऊन शकले नाही. आता या खरीपाकरिता बी-बियाणे कुठून आणावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कृषी केंद्रांकडून यावर्षी शेतकऱ्यांना उधारीवर बी-बियाणे, खते व औषधी मिळण्याची शक्यता तशी कमीच आहे.

सोयाबीन बियानाचा तुटवडा होणार ?
मागील वर्षी सोयाबीन पीक हाती येत असताना अवकाळी पावसाने झोडपले. परिणामी सोयाबीनला काळे डाग पडले होते. त्यामुळे बियाने तयार करताना अडचणी निर्माण झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे यावर्षी सोयाबीन बियानाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

 

Web Title: How to carry the burden of kharif?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी