राजुरा तालुक्यात आवास योजना सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:26 IST2021-03-25T04:26:34+5:302021-03-25T04:26:34+5:30
याअंतर्गत घरकुलाशी संबंधित विविध योजनांमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश राज्य स्तरावरून देण्यात आले होते. ...

राजुरा तालुक्यात आवास योजना सुरू
याअंतर्गत घरकुलाशी संबंधित विविध योजनांमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश राज्य स्तरावरून देण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून गट विकास अधिकारी डॉ. ओम रामावत, कार्यक्रमाचे अध्यक्ष कुंदा जेणेकर, तसेच
प्रमुख पाहुणे म्हणून तालुका अभियान व्यवस्थापक संध्या डोंगरे, सरपंच अमित टेकाम, उपसरपंच धानोरकर, ग्रामसेवक पोले, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता कल्याणी भोयर, आकाश गिडवाणी, पशुधन पर्यवेक्षक डॉ. जोत्स्ना इंगोले, ग्रामसंघ अध्यक्ष छाया धोटे, प्रभाग संघ कोषाध्यक्ष पौर्णिमा डभारे, प्रभाग -समन्वयक अमित भगत, समुदाय पशु व्यवस्थापक संदीप रामटेके, प्रेरिका शांता चांदेकर उपस्थित होते. घरकुल तसेच इतर बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी कमी दरात मिळावे या संकल्पनेतून घरकुल मार्टची सुरुवात करण्यात आलेली आहे.