रिपब्लिकन-आंबेडकरी जनतेच्या ऐक्याची सभा
By Admin | Updated: September 11, 2016 00:47 IST2016-09-11T00:47:02+5:302016-09-11T00:47:02+5:30
चंद्रपूर महानगर पालिका निवडणूक २०१७ या विषयाच्या अनुषंगाने रिपब्लिकन-आंबेडकरी जनतेच्या ऐक्य बैठकीचे आयोजन...

रिपब्लिकन-आंबेडकरी जनतेच्या ऐक्याची सभा
चंद्रपूर : चंद्रपूर महानगर पालिका निवडणूक २०१७ या विषयाच्या अनुषंगाने रिपब्लिकन-आंबेडकरी जनतेच्या ऐक्य बैठकीचे आयोजन बॅर. राजाभाऊ खोबरागडे भवन येथे प्रवीण खोबरागडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
प्रवीण खोबरागडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्व आंबेडकरी विचारांच्या पक्षांना संघटनांना, बौद्ध मंडळांना सोबत घेऊन वार्ड प्रभाग निहाय समिती गठित करणार असल्याचे सांगितले. प्रत्येक प्रभागात त्यातील गटानुसार समाजातील एकच उमेदवार उभा करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. आंबेडकरी चळवळ गतिमान करण्यास रिपब्लिक, आंबेडकरी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या सभेत आंबेडकरी चळवळीत कार्यरत विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना बौद्ध विचारांचे प्रतिनिधी, शहरातील व जिल्ह्यातील शेकडो आंबेडकरी अनुयायांची उपस्थिती होती. राजू झोडे, मोनल भडके, राजकुमार जवादे, डॉ. राकेश गावतुरे, बाजीराव उंदिरवाडे, धृव करमरकर, जयप्रकाश कांबळे, रमेशचंद्र राऊत, प्रतिक डोर्लीकर आदी सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आंबेडकरी जनतेच्या ऐक्यासाठी तयार असल्याचे सांगितले.यावेळी धनंजय मेश्राम, वामन सरदार, सविता कांबळे, वनिता सहारे, ज्योतीताई सहारे, महादेव कांबळे, अशोक निमगडे, प्रशांत रामटेके, अशोक फुलझेले आदींनी आंबेडकरी जनतेच्या ऐक्यामध्ये सर्व सामाजिक संघटनांनी, महिला मंडळांनी व युवकांनी सक्रीय सहभाग नोंदवावा व आंबेडकरी चळवळ अधिक बळकट करण्याचे आवाहन केले.
सभेचे संचालन राजू खोबरागडे, प्रास्ताविक विशालचंद्र अलोणे तर आभार प्रा. नितीन रामटेके यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हरिदास देवगडे, स्नेहल रामटेके, भाऊराव दुर्योधन, संदीप देव, गायत्री कवाडे, नीतू झाडे, राहुल फुलझेले, ज्योती शिवणकर, नेहा मेश्राम, राजश्री शेंडे आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)