घुग्घुस येथे घराला आग

By Admin | Updated: January 7, 2016 01:27 IST2016-01-07T01:27:21+5:302016-01-07T01:27:21+5:30

येथील इंदिरानगर वॉर्डातील डॉ. सुनील गिरी यांच्या घराला लागून घरातील नगद, सोन्याचे दागिने, टीव्ही, कागदपत्रासह दीड लाखांचे साहित्य जळाले.

The house fire at Goghugas | घुग्घुस येथे घराला आग

घुग्घुस येथे घराला आग

साहित्य जळून खाक : दीड लाखांचे नुकसान
घुग्घुस : येथील इंदिरानगर वॉर्डातील डॉ. सुनील गिरी यांच्या घराला लागून घरातील नगद, सोन्याचे दागिने, टीव्ही, कागदपत्रासह दीड लाखांचे साहित्य जळाले. ही घटना मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.
इंदिरानगेर येथील सरिता नलबोगा यांच्या घरी किरयाने राहणारे डॉ. गिरी यांची पत्नी नेहमी प्रमाणे सांयकाळी डॉ. सुनील जटाशंकर गिरी यांचा चर्चनजीक असलेल्या दवाखान्यात घरातील देवघरात दिवा लाऊन मुला सोबत गेल्या होत्या. दरम्यान घराला आग लागल्याची माहिती मिळाली. डॉ. दापत्यांनी तात्काळ घराकडे धाव घेतली. मात्र घरातील सर्व साहित्य भस्म झाले होते.
आग लागल्याचे वृत्त मिळताच उपसरपंच संतोष नुने, ग्रामपंचायत सदस्य संजय तिवारी, पूजा दुर्गम, निरीक्षण तांड्रा व शेजाऱ्यांनी पाण्याचा मारा करून आग विजविली. मात्र तोपर्यत घरातील महत्वाचे कागदपत्रे, सोन्याचे दागिने, कपडे व मुलाच्या शाळेची फी भरण्याकरिता ठेवलेले ३० हजार रुपए नगदी रक्कम व सामानाची राख झाली. या आगीत दीड लाखाचे नुकसान झाले. बुधवारी सकाळी येथील पटवारी दिलीप पिल्ले यांनी घटनास्थळी भेट देवून घटनास्थळाचा पंचनामा करून अहवाल पाठविला आहे. (वार्ताहर)

Web Title: The house fire at Goghugas