हॉटेल्स, रेस्टॉरंट, सिनेमागृहे ५० टक्के क्षमतेतच सुरू ठेवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:28 IST2021-03-18T04:28:09+5:302021-03-18T04:28:09+5:30
राज्य शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार सिनेमागृहे, हॉटेल्स, रेस्टॉरंट व सर्व शाॅपिंग मॉल्स व धार्मिक ठिकाणच्या परिसरामध्ये मास्क परिधान केल्याशिवाय ...

हॉटेल्स, रेस्टॉरंट, सिनेमागृहे ५० टक्के क्षमतेतच सुरू ठेवावी
राज्य शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार सिनेमागृहे, हॉटेल्स, रेस्टॉरंट व सर्व शाॅपिंग मॉल्स व धार्मिक ठिकाणच्या परिसरामध्ये मास्क परिधान केल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. सर्व ठिकाणी तापमापीचा उपयोग करून शरीराच्या तापमानाची नोंद घेण्यात यावी व ताप असलेल्या कोणत्याही व्यक्तीला प्रवेश दिला जाणार नाही. प्रवेशद्वार तसेच इतर ठिकाणी पुरेशा प्रमाणात हॅण्ड सॅनिटायझर ठेवण्यात यावे. सर्व आस्थापनांमध्ये पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ नियुक्त करावे, जेणेकरून सर्व अभ्यागतांबाबत मास्क परिधान केला जाईल, शारीरिक अंतर राखले जाईल, याची तपासणी केली जाईल. आदेशाचा भंग केल्यास, संबंधित आस्थापना मालकांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिल्या आहेत.
सर्व सार्वजनिक कार्यक्रमांना मनाई
सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम, सभा, मोर्चा, मिरवणुका संमेलने तसेच यात्रा, उत्सव, उरूस आयोजन करण्यास परवानगी असणार नाही. विवाह समारंभ कार्यक्रमास फक्त ५० नागरिकांना तर अंत्ययात्रेत सहभागी होण्यास फक्त २० नागरिकांना परवानगी असेल. स्थानिक प्राधिकरण या अटींचे पालन केले जात असल्याबाबत खात्री करतील.
बाधितांच्या घरासमोर फलक लावणार
गृहअलगीकरण झालेल्या नागरिक व रुग्णांविषयीची माहिती संबंधित स्थानिक प्राधिकरण यांना कळविणे. तसेच गृहअलगीकरण व्यक्ती ही कोणत्याही वैद्यकीय व्यावसायिकांच्या देखरेखीखाली आहे, त्याची माहिती स्थानिक प्रशासनास देणे बंधनकारक असेल. कोविड १९ रुग्ण असलेल्या ठिकाणी सुरुवातीच्या दिवसापासून १४ दिवसांपर्यंत दर्शनी ठिकाणी फलक लावण्यात येणार आहे. रुग्णांच्या हातावर गृहअलगीकरण असा शिक्का मारला जाणार आहे.