हॉटेलबंदीने महिलांची भाजी-भाकरी थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:25 IST2021-04-12T04:25:44+5:302021-04-12T04:25:44+5:30
बॉक्स वर्ष कसे काढले आमचे आम्हाला ठाऊक १) मागील वर्षी कोरोनामुळे सुमारे ८ ते १० महिने सर्व हॉटेल बंद ...

हॉटेलबंदीने महिलांची भाजी-भाकरी थांबली
बॉक्स
वर्ष कसे काढले आमचे आम्हाला ठाऊक
१) मागील वर्षी कोरोनामुळे सुमारे ८ ते १० महिने सर्व हॉटेल बंद होती. त्यामुळे काम नसल्याने संपूर्ण वर्ष आर्थिक अडचणीत गेले. लोकांकडून कसेबसे उधार घेऊन उदरनिर्वाह भागविण्यात आला.
२) आताही लोकांचे देणे बाकी आहे. यंदातरी कष्ट करून ते देणे भागवावे, असा विचार होता. मात्र आता पुन्हा तशीच स्थिती आल्याने देणे भागवावे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
३) शासनाकडून मागील वर्षीसुद्धा कसलीही मदत मिळाली नाही. आताही आमचे काम बंद आहे. त्यामुळे काय खायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. कोट-------
हॉटेलमध्ये काम करून मिळालेल्या मोबदल्यात घरखर्चास मदत होत होती. मात्र मागील वर्षीपासून कोरोनामुळे काम बंद होते. उसनवारी करून कसेतरी भागवले. आता पुन्हा काम सुरू झाले होते. परंतु, प्रशासनाने पुन्हा निर्बंध लादल्याने काम बंद झाले आहे.
- पार्वताबाई वांढरे,
कामगार महिला------
मागील वर्षी ८ ते १० महिने हॉटेल बंद होते. त्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. आता कुठे काम मिळत होते. पुन्हा काम बंद झाल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागता आहे.
- सखूबाई मेश्राम, कामगार महिला
------
दोघेही नवरा-बायको काम केले तरी संसाराचा डोलारा हाकताना मोठी कसरत होते. आता ना नवऱ्याला काम ना मला काम, त्यामुळे कुटुंब चालवायचे कसे, असा प्रश्न पडत आहे. शासनातर्फे घराबाहेर पडल्यास कोरोना होण्याची शक्यता असल्याचे सांगत आहे. परंतु, विना काम घरी राहून उपाशी मरण्याची वेळ आली आहे.
- इंदिराबाई कोडापे, कामगार महिला